धक्कादायक… ब्रिटनच्या पंतप्रधानांना कोरोनाची लागण, ब्रिटन सहा महिन्यांसाठी लॉकडाऊन ;वाचा सविस्तर-

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसने अनेक नागरिकांना संक्रमित केले आहे. आताच मिळालेल्या माहितीनुसार ब्रिटनच्या पंतप्रधानांना कोरोना व्हायरची लागण झाल्याची माहिती मिळते आहे. त्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये सहा महिन्यांचे लॉकडाऊन करण्याचा निर्णय ब्रिटनच्या सरकारने केला आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. काही वेळापासून आपल्याला काही लक्षणं जाणवत असून स्वत:ला विलगीकरणात ठेवत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्याबाबत त्यांनी ट्विट करत स्वत: आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. या घटनेने संपुर्ण जगात मोठी खळबळ उडाली आहे.  

याआधी ब्रिटीश राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना व्हायरसचा शाही राजघराण्यातही शिरकाव झाल्यानंतर कोरोनाबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. बोरिस जॉन्सन यांनी एका ट्विट करत अशी माहिती दिली आहे की गेल्या 24 तासांपासून मला काही हलकी लक्षणं जाणवत होती.

त्याबाबत मी कोरोनाची तपासणी केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मी सध्या विलगीकरणात आहे. कोरोनाशी लढा देत मी मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सरकारचं नेतृत्त करत राहणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटन सरकारने 6 महिने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: