दिल्लीत अग्नितांडव, 43 लोकांचा मृत्यू, 14 जखमी

दिल्लीतल्या राणी झाशी रोडवरील एका कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

अनाज मंडी येथील फिल्मिस्तानमधील कारखान्यात ही आग लागली आहे.

रविवारी या भीषण आगीत आतापर्यंत 43 लोकांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्लीः दिल्लीतल्या राणी झाशी रोडवरील एका कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अनाज मंडी येथील फिल्मिस्तानमधील कारखान्यात ही आग लागली आहे. रविवारी या भीषण आगीत आतापर्यंत 43 लोकांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमनदल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू करत जवळपास 50 हून अधिक लोकांना सुरक्षित रित्या बाहेर काढण्यात आलं आहे. ज्या इमारतीत आग लागली ती  इमारत तीन ते चार मजली असल्याची बोलली जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

जखमींना एलएनजेपी, राम मनोहर लोहिया, सफदरजंग आणि अन्य रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लोक नायक रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर कुमार यांनी आगीत जखमी झालेल्याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, जवळपास 14 लोकं जखमी झाले असून डॉक्टरांची टीम जखमींवर उपचार करत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: