तृणमूलच्या खासदार अभिनेत्रीचे तुर्कीत लग्न, बिझनेसमनसोबत अडकली विवाहबंधनात

ग्लोबल न्यूज नेटवर्क | तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून पहिल्यांदाच खासदार बनलेली बंगाली अभिनेत्री नुसरत जहां विवाहबंधनात अडकली आहे. बुधवारी तुर्कीमध्ये तिने विवाह केला. कोलकाताचा बिझनेस मन निखिल जैन सोबत ती साताजन्माच्या गाठीत अडकली.
लग्न असल्याकारणामुळे ती खासदारकीची शपथ घेऊ शकली नाही. आपल्या ट्विटर अकाउंटवरुन नुसरतने लग्नाचे फोटोज शेअर करत लग्नाचे वृत्त दिले. हिंदू पध्दतीने हा विवाह सोहळा संपन्न झाला. विवाह सोहळ्यात दोन्ही पक्षांचे नातेवाईक आणि मित्रांची उपस्थिती होती.

तुर्कीच्या बोडरम येथे झाले लग्न

तुर्कीच्या बोडरम शहरात हा विवाहसोहळा पार पडला. मुगला राज्यात हे शहर आहे. पाहुणे मंडळी काही दिवसांपुर्वीच या ठिकाणी पोहोचली होती. नुसरतचे कुटुंब, त्यांची बहीण आणि जवळचे नातेवाईक 16 जूनलाच तेथे पोहोचले होते. 29 वर्षांच्या नुसरतने सोशल मीडिया अकाउंटवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहे. नुसरतने प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी याने डिझाईन केलेला लेहेंगा घातला होता. नुसरत व निखिल यांचा रिसेप्शन सोहळा 4 जुलैला कोलकाता येथे होणार आहे.

नुसरत बंगाली चित्रपटांमधील प्रसिध्द अभिनेत्री आहे. तिने पश्चिम बंगालच्या बशीरहाट मतदारसंघातून निवडणूक लढवली. तिने 3.5 लाख मतांनी निवडूण आली आहे.

धिरज करळे: