तरुणांची साथ, विश्वासू कार्यकर्त्यांची फौज व विकासाच्या मुद्द्यावर झाला राजेंद्र राऊत यांचा विजय,कमी झालेला जनसंपर्क,ऐनवेळी केलेला पक्षबदल यामुळे सोपलांना जावे लागले पराभवाला सामोरे

बाशी : गेल्या दोन निवडणुकांपासून पराभव पत्करलेल्या राजेंद्र राऊत यांनी यावर्षी कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच या दृष्टीने केलेले योग्य व अचुक नियोजन, तरुण व विश्वासू कार्यकर्त्यांची तगडी फौज, तरुणांचा पाठींबा, विकासाच्या मुद्द्यावर दिलेला भर, राष्ट्रवादीची काँग्रेसची उमेदवारी ,स्वत:सह कार्यकर्त्यांमध्ये असलेला प्रचंड आत्मविश्वास यामुळे अपक्ष असून देखील राजेंद्र राऊत हे विजय मिळवण्यात यशस्वी ठरले तर गेल्या तीन वर्षापासून तालुक्यात कमी झालेला जनसंपर्क, अतिआत्मविश्वास, ऐनवेळी केलेला पक्षबदल, प्रचारात असलेला नियोजनाचा अभाव,महायुतीचे वातावरण तयार करण्यात आलेले अपयश आदी कारणांमुळे सोपल यांना पराभवाला सामोरे जावे लागले असल्याचे निकालावरुन दिसून येते.

बार्शी तालुक्यात गेल्या विस वर्षापासून दिलीप सोपल व राजेंद्र राऊत यांच्यात प्रत्येक निवडणुकीत अटीतटीचा सामना पहावयास मिळत आहे़ गावोगावी या दोघांचेच गट प्रबळ असल्यामुळे इथे पक्षाऐवजी व्यक्तीकेंद्रीत राजकारण चालते हा अनुभव आहे़ भाजपात असलेल्या राजेंद्र राऊत यांना महायुतीची उमेदवारी मिळेल असे चित्र होते़ होते मात्र अचानक राष्ट्रवादीत असलेले शरद पवारांचे विश्वासू दिलीप सोपल यांनी राजेंद्र राऊत यांची कोेडी करण्यासाठी शिवसेनेचे धनुष्यबाण हातात घेतले,मात्र निवडणुकीचा निकाल पहाता त्यांनी राऊतांची नव्हे तर स्वताची कोंडी करुन घेतली असल्याचे दिसून येते़
राऊत यांनी गेल्या वर्षाभरापासून कोणत्याही परिस्थितीत ही निवडणुक जिंकायचीच असा निश्चय केला होता व त्यादृष्टीने नियोजन केले होते़ त्यातच मागील तीन वर्षात झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद, बाजार समिती आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आलेली सत्ता यामुळे त्यांचा व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलेला होता.

तसेच सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आपल्याला युतीची उमेदवारी मिळणार नाही, हे गृहीत धरुन अपक्ष म्हणून लढण्याची पूर्ण ताकतीनिशी तयारी केली होती़पडद्याआड रावसाहेब मनगिरे व अरुण बारबोले यांनी केलेले नियोजन, रणवीर राऊत यांच्या नेतृत्वाखालील युवकांची टिम ही विजयाला कारणीभूत ठरली़ राऊत यांनी प्रचारात सोपल यांचे बाजार समिती भ्रष्टाचार, आर्यन कारखाना,वैराग तालुका, बार्शी उपसा सिंचन योजना,एमआयडीसी, आदीसह शहरातील विकासकामांवर भर दिला.

त्याचा ही त्यांना फायदा झाला़ अपक्ष असताना देखील राऊत गटात सोपल गटातून मोठ्या प्रमाणात प्रवेश झाले,तसेच विश्वास बारबोले,आसिफ तांबोळी,कोरके,डिसले,निंबाळकर, यांच्यासह सर्व नेते व कार्यकर्त्यांनी जिद्दीने प्रचार केला व त्याचे रुपांतर विजयात झाले.

निरंजन भूमकर यांची उमेदवारी ही राऊत यांच्यासाठी फायद्याची ठरली़ जी मते राऊत यांना पडू शकत नव्हती मात्र सोपलांची होती ती मते भूमकर यांच्याकडे वळली़ त्यामुळे यंदा प्रथमच सोपल यांच्या पारंपारिक मताला धक्का लागला़ राऊत यांनी प्रचाराच्या सांगतेची घेतलेली शेवटची भव्य सभा ही त्यांच्यासाठी फायद्याची ठरली.

तर सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला तरी ते महायुतीला राज्यात जसे पोषक वातावरण आहे तसे बार्शीत निर्माण करण्यात यश आले नाही़ कारण जास्त हिंदूत्ववाद अथवा भगवावाद तयार करावा तर अल्पसंख्याक मते दूर जातील या चक्रव्युहात ते अडकले़ तसेच बाजार समिती व पं़स़च्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे तसेच बाजार समितीचे दाखल असलेले गुन्हे यामुळे त्यांचा आत्मविश्वास खचलेला होता तो वाढलाच नाही.

तसेच प्रचाराचा टेंप्पो तयार करण्यात देखील सोपल यांना अपयश आहे़ त्यांचा दांडगा जनसंपर्क असताना देखील महाहौसिंगचे सहअध्यक्ष असलेले राजेंद्र मिरगणे व शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर यांना पुढे
केल्याने सोपल प्रचारात जास्त उठून दिसले नाहीत़ नव्हे तर या दोघांच्या काहीसे दबावात असल्याचे दिसून आले.

गटातून आऊटगोइंग होत असताना ते रोखण्यात देखील त्यांना अपयश आले़ राष्ट्रवादीचे उमेदवार भूमकर यांच्या रुपाने त्यांचा वैराग भागातील हक्काचा मतदार ही त्यांच्यापासून लांब गेला़त्यांना उमेदवारी घेण्यापासून ते रोखू शकले नाहीत़ कांही प्रमाणात मुस्लिम मते ही त्यांच्यापासून दुर गेली.शहर व वगळता संपूर्ण ग्रामीण भागाने राऊत यांना साथ दिली़ तसेच त्यांचा राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाण्याचा निर्णय देखील बार्शीकरांना रुचलेला नाही हे निकालावरुन दिसून आले.

आपल्याला शहरातून भरपूर लिड मिळणार अशा आति आत्मविश्वासात ते अडकून पडले होते़ तसेच मागील दोन वर्षापासून त्यांचा शहर व ग्रामीण भागात कमी झालेला जनसंपर्क ही पराभराव कारणीभूत ठरला आहे़ ऐन निवडणुकीत शिवाजीराव गायकवाड, कपील कोरके यांचे राऊत गटात झालेला प्रवेश ही पराभवाला कारणीभूत ठरले असल्याचे दिसत आहे़

ग्लोबल न्युज नेटवर्क: