चांद्रयान-2 बद्दल 10 वर्षांपूर्वी मुंबईतील परिसंवादात मिसाईल मॅन डॉ कलाम म्हणाले होते भविष्यात..!

नवी दिल्ली : चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरचा इस्रो मुख्यालयाशी संपर्क तुटला आणि संपूर्ण देशभरात काहीशी निराशा झाली. चंद्राच्या दक्षिण धृवावर पोहोचणारी पहिली मानवी मोहिम म्हणून, इस्रोच्या या मोहिमेकडे पाहिले जात होते. पण, दुदैवाने लँडरचा संपर्क तुटला आणि चांद्रयान-२ मोहीम अपयशी ठरली. तरी देखील इस्रो च्या शास्त्रज्ञानी आशा सोडलेली नाही.या मोहिमेच्या निमित्ताने भारताची माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आठवण केली जात आहे. या मोहिमेसाठी डॉ. कलाम यांनी 10 वर्षापूर्वी चांद्रयान-१’ च्या यशानंतर वर्षभराने मुंबईमध्ये झालेल्या ”चांद्रयान: आश्वासने आणि चिंता’ या विषयावरील परिसंवादामध्ये कलाम यांनी आपले मत मांडले होते.

नासा आणि इस्रोने एकत्र काम करावे

जगात अंतराळ मोहिमांमध्ये अमेरिकेची नासा ही सर्वांत यशस्वी संस्था आहे. चंद्र मोहिमेचा विचार केला तर, आतापर्यंत अमेरिकेच्या नासा नंतर रशिया आणि चीनने चंद्रावर यान उतरविले होते. भारतानेही चांद्रयान-१ मोहिमेतून चंद्राच्या पृष्ठभागाचा फोटोद्वारे अभ्यास केला होता. त्यातून चंद्रावर पाणी असल्याचा दावा केला होता. इस्रोच्या या दाव्याला नासा आणि इतर अंतराळ संस्थांनीही दुजोरा दिला होता. चंद्रावर पाणी असण्याच्या या संशोधनानंतर नासा आणि इस्रो यांनी एकत्र मोहिम राबवावी, अशी डॉ. अब्दुल कलाम यांची इच्छा होती.

नव्या संशोधकांना मिळणार ऊर्जा

डॉ. कलम एकदा अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात गेले होते. त्यावेळी काही शास्त्रज्ञांनी डॉ. कलाम यांची भेट घेतली होती. चांद्रयान-१ मोहिमेविषयीही डॉ. कलाम यांनी समाधान व्यक्त केले होते. चांद्रयान-१ ही मोहिम २२ ऑक्टोबर २००८ रोजी लाँच करण्यात आली होती. चंद्राच्या कक्षेत असलेल्या या यानाचा इस्रोशी २८ ऑगस्ट २००९पर्यंत संपर्क होता. त्या दरमान चंद्राच्या भू भागाचे चांगले फोटो यानाने घेतले होते. या मोहिमेमुळे नव्या दमाच्या शास्त्रज्ञांमध्ये ऊर्जा निर्माण होईल आणि पुढे इतर ग्रहा्ंना भेट देण्यात ही मोहीम निर्णायक ठरले, असे मत डॉ. कलाम यांनी चांद्रयान-१नंतर व्यक्त केले होते.

डॉ. कलाम यांचा सल्ला

डॉ. कलाम यांनी इस्रो आणि नासा यांना एकत्र मोहीम राबविण्याचा सल्ला दिला होता. मानवाला चंद्रावर किंवा इतर कोणत्याही ग्रहावर पाण्याचे अस्तित्व आहे का? याविषयी कुतूहल आहे. पण, चंद्रावर पाण्याचा अंश असल्याचे संशोधन इस्रोने केल्यानंतर नासा आणि इस्रो यांनी एकत्र मोहिम राबवावी, असे डॉ. कलाम यांचे मत होते. त्याचबरोबर ‘नासाने भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेत चंद्राच्या भूभागावर खड्डा खणणारा पेनिटेटर (रोबोट) बसवावा. याच्या माध्यमातून चंद्राच्या भूगर्भात पाण्याचा अंश असल्याचे आणखी ठोस पुरावे गोळा करता येतील. त्याचा अधिक चांगला अभ्यास करता येऊ शकतो,’ असे मत डॉ. कलाम यांनी व्यक्त केले होते. आज, चांद्रयान-२ मोहिमेच्या अपयशानंतर दुःख होत असले तरी, आज डॉ. कलम यांची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे.

The former President, Dr. A.P.J. Abdul Kalam delivering key note address on “Strength Respects Strength”, at the 5th Admiral A.K. Chatterji Memorial Lecture, in Kolkata on April 11, 2015.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: