जातीयता नष्ट करण्याची ताकद वारकरी संप्रदायातच : हभप. रविंद्र महाराज हरणे

अंबड :  आजच्या धावपळीचे विज्ञान युगात माणूस नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून चंद्राला गवसणी घालायचे प्रयत्न करतोय शेजारधर्माचे पालन करताना विवेकशुन्य होतो. जागोजागी सांप्रदायिकता जातीयवाद जोपासतो. मात्र समाजातील जातीयवादाचा समूळ नायनाट वारकरी संप्रदाय विचारच करू शकतात त्याकरिताच पंढरीची वारी आहे. असे परखड प्रतिपादन रविंद्रमहाराज हरणे मत्सोदरी देवी संस्थान अंबड येथील कीर्तनातून केले.

जिथे तिथे पहा माणसं एकमेकांना शेजारीना सुखदुःखात समरस होत नाहीत क्षुल्लक कारणाने हातघाईवर येतात.भाऊबंदकीची अनेक उदाहरणं देता येतील. जात विचारूनच पुढचे बघीतले जाते एवढी तिव्र जातीयता समाजात ठसठसून भरलेली असतांना पंढरीच्या वारीत प्रत्येक गावात वारकरी घरोघरी नेवून जेवू घालतात कशामुळे तर वारकरी संप्रदाय संतानी दिलेल्या शिकवणीमुळेच तिथे तुम्हाला कधी कोणी जात विचारली का?नाही ना ..का नाही..त्यांची एकच भावना असते आपल्या घरी आलेला वारकरी हा प्रत्यक्षात पांडूरंग परमात्मा आदिशक्ती मुक्ताबाई माऊली आहेत हीच भावना ठेवून सेवा केली जाते.


हिच भागवत धर्म वारकरी पंथाची शिकवण पंढरीच्या वारीत अनुभवता येते. वारकरी संप्रदायात सर्व समाजाचे संतानी जातीयवादाला थारा न देता मानसामानसात बंधूभाव जागविला आजच्याही काळात संत विचाराची प्रेरणा वारीतून मिळते असे संत मुक्ताबाई पालखी सोहळा अंबड मुक्कामी कीर्तनातून विषद केले.

अंबड शहरात पालखी सोहळा अदभूतपुर्व स्वागत झाले .समाजआरती नंतर वारकरी भाविकांना घरोघरी जेवण दिले. अंबड वासीयाचे निरोप घेत मत्सोदरी देवी संस्थान येथून पालखी मंगळवार सकाळी वडीगोद्री मुक्कामी मार्गस्थ होईल.

admin: