जातीपातीपेक्षा विकास महत्त्वाचा आहे : ना. सुभाष देशमुख

सोलापूर: जातीपातीपेक्षाही सार्वजनिक विकास हाच महत्त्वाचा आहे. आणि विकासावर व्यापक चर्चा होणे महत्वाचा असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुडल येथील ग्रामदैवत तीर्थक्षेत्र श्री. संगमेश्वर देवस्थान परिसरातील विविध विकास कामांचा आज खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांच्या हस्ते १ कोटी ८३ लाख विकास कामाचे शुभारंभ करण्यात आले.
सहकारमंत्री देशमुख म्हणाले, जातीपातीचा विचार न करता विकासावर व्यापक चर्चा होणे महत्त्वाचा आहे. तालुक्यात नेतृत्त्वाच्या भरवशावरच विकासाच काम करत आहे. प्रत्येकाकडे दृष्टी असण महत्त्वाचा आहे. मंदिर परिसराचा विकासाची कामात जनतेचही सहभाग महत्त्वाचा आहे. सध्याचे खासदारच अध्यात्मिक क्षेत्रातील असल्यामुळे जिल्हयातील धार्मिक क्षेत्राचा विकास होईल. शैक्षणिक क्षेत्रही दर्जेदार कराव लागेल.
खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी म्हणाले, कोणत्याही कामात सकारात्मक दृष्टी असण महत्त्वाचा आहे. यामुळे कोणतही काम अशक्य नाही. कुडल येथील शिलालेख म्हणजे मराठी भाषेचा पुरातनचा इतिहासाचा आरसा आहे. जगात भारताची प्रतिमा उच्च करण्याचा काम पंतप्रधान मोदींनी केलेली आहे. दक्षिण सोलापूरचे आमदार देशमुख हे प्रामाणिक पोस्टमन आहेत. काम करून घेण्याची त्यांची तयारी आहे.
प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील- वडकबाळकर, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष प्रशांत कडते, जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील, पंचायत समिती सदस्य महादेव कमळे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस हणमंत कुलकर्णी, तालुका सरचिटणीस यतीन शहा, उपसभापती संदीप टेळे, तहसीलदार रमा जोशी, चिदानंद कोटगोंडे, जिल्हा परिषद सदस्य अण्णाराव बिराजदार, सचिन पाटील, शिवानंद पाटील, मुंबई बाजार समितीचे संचालक मळसिध्द मुगळे, हणमंत पुजारी, मायप्पा जंगलगी, निंबण्णा जंगलगी, मिनाक्षी टेळे, लोकमंगल पतसंस्थेचे अध्यक्ष गुरण्णा तेली, षडाक्षरी बिराजदार, डॉ. चनगोंडा हविनाळे, पंचायत समिती सदस्य शशीकांत दुपारगुडे, गौरीशकर मेंडगुदले सह अन्य उपस्थितांचे देवस्थान समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

admin: