जम्मू काश्मीर कलम 370 काय आहे शिवसेनेची भूमिका,वाचा सविस्तर-

जम्मू-कश्मीरमधील कलम 370 रद्द करून कश्मीरला हिंदुस्थानच्या मुख्य प्रवाहात आणण्याची मागणी शिवसेनेने सातत्याने केली. कलम 370 रद्द व्हावे ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा असल्याचे सांगत शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी जम्मू-कश्मीर सुधारणा विधेयकाचे लोकसभेत स्वागत केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1949 मध्ये कलम 370 च्या मसुद्याला विरोध केला होता, परंतु जवाहरलाल नेहरू यांच्या सांगण्यावरून गोपालस्वामी अय्यंगार यांनी 370 चा मसुदा तयार केला. त्यामध्ये महाराजा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार काम करतील, असे म्हटले होते. मात्र नेहरू आणि शेख अब्दुला यांनी संगनमत करून सर्व अधिकार राज्य सरकारकडे सोपविले असे सांगत शेवाळे यांनी कलम 370 रद्द करण्याची आग्रही मागणी केली.

त्याचवेळी त्यांनी कश्मिरी पंडितांवर होणाऱया अन्यायाकडेही लक्ष वेधले. जम्मू-कश्मीरला वेगळा दर्जा देऊन हिंदुस्थानच्या मुख्य प्रवाहापासून हे राज्य अलग करण्याचे काम काँग्रेसने केले. हिंदुस्थानचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे कलम 370 च्या विरोधात होते. अमित शहा यांच्यामध्ये आम्ही सरदार पटेल यांना बघत आहोत आणि तेच कश्मीर समस्येवर तोडगा काढतील, असे शेवाळे म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: