जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची सुटका, ‘होम क्वारंटाईन’वर उपरोधिक ट्विट

जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची तब्बल आठ महिन्यानंतर सुटका करण्यात आली. जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाआधी एक दिवस 4 ऑगस्टला ओमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना अटक करण्यात आली होती. आता आठ महिन्यानंतर सुटका झाल्यावर ओमर अब्दुल्ला यांनी कपिल सिब्बल, गोपाळ शंकरणारायन आणि बहीण सारा यांचे आभार मानले, तसेच सध्या कोरोनामुळे लोकांना होम क्वारंटाईन करण्यात येत असल्याने याबाबत एक उपरोधिक ट्विट देखील केले.

केंद्र सरकारने जम्मू-कश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा मोठा निर्णय गेल्या वर्षी घेतला. या निर्णयामुळे खोऱ्यातील वातावरण खराब करू नये म्हणून फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यासह अनेक नेत्यांना अटक करण्यात आली होती. या नंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी फारुख अब्दुल्ला यांची सुटका करण्यात आल्यानंतर मंगळवारी ओमर अब्दुल्ला यांचीही सुटका करण्यात आली. ओमर अब्दुल्ला यांची नजरकैद 5 फेब्रुवारीला संपणार होती, मात्र पब्लिक सेफ्टी ऍक्ट अंतर्गत त्यांना ताब्यात ठेवण्यात आले होते. मंगळवारी सुटका झाल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांनी ओमर अब्दुल्ला यांची भेट घेतली.

ओमर अब्दुल्ला यांची बहीण सारा पायलट हिने पब्लिक सेफ्टी ऍक्ट 1978 अंतर्गत त्यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 17 मार्चला झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाला एका आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी ओमर अब्दुल्ला यांची सुटका करण्याचा विचार असल्यास लवकरात लवकर करावी असे आदेश जम्मू-कश्मीर प्रशासनाला दिले होते. पुढील आठवड्यापर्यंत सुटका झाली नाही तर, त्यांच्या बहिणीने दाखल केलेल्या याचिकेवर मेरिटआधारे सुनावणी करावी लागेल, असेही न्यायालयाने नमूद केले होते. अखेर आठवड्याच्या आत ओमर यांची सुटका करण्यात आली.

उपरोधिक ट्विट
ओमर अब्दुल्ला यांनी सुटका झाल्यानंतर ट्विट करता कपिल कपिल सिब्बल, कपिल सिब्बल, गोपाळ शंकरणारायन आणि बहीण सारा यांचे आभार मानले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: