ग्रामिण विद्यार्थ्यांना नोकरीसाठी योग्य मार्गदर्शनाची गरज : राजेंद्र मिरगणे सी. एम. मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्गास प्रारंभ 

सी. एम. मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्गास प्रारंभ 
गणेश भोळे
बार्शी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता व कष्टाची तयारी असली तरी त्यांना स्पर्धा परिक्षाबाबत योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे येत्या दोन महिण्यात होणारी राज्य व केंद्र शासनाची हजारोंची कर्मचारी भरती लक्षात घेवुन सी.एम. स्पर्धा परिक्षा मोफत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले आहे. या वर्गातून परिक्षेला सामोरे जाण्यासाठी  सखोल माहिती मिळवुन विद्यार्थी घडावेत अशी अपेक्षा महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पार्टी व आर.एस.एम.समाजसेवा संस्थेच्या वतीने आयोजित सी.एम. मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते भाऊ साहेब आंधळकर, भा.ज.पा. जिल्हाउपाध्यक्ष अरूणभाऊ  कापसे, शिवसेना शहरप्रमुख दिपक आंधळकर, प्रशिक्षक रत्नेश अग्रलवाल, रमाकांत कापसे, बीडचे अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, मुंबई मंत्रालयातील अवर सचिव अविनाश सोलवट, डॉ.विलास कांबळे, उद्योगपती दिनेशसिंह परदेशी आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. 
यावेळी मिरगणे म्हणाले गेल्या काही वर्षात बार्शी तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सद्यस्थितीमध्ये शेतकर्‍यांच्या मुलांना नोकर्‍यांची गरज आहे. तसेच बार्शी सारख्या निमशहरी ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना नोकरीबाबत महानगरांच्या धर्तीवर मार्गदर्शनाची गरज आहे. पण सर्वच गरजू विद्यार्थी आर्थिक क्षमता नसल्यामुळे स्पर्धा परिक्षेच्या मार्गदर्शन वर्गापासून वंचित राहतात. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थी नोकरीच्या संधींना मुकतात. नुकताच सकल मराठा समाजाला आरक्षणही मिळाले आहे. अशा परिस्थितीत सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांना राज्यातील अनुभवी व तज्ञ प्रशिक्षकांचे दिशादर्शन लाभावे या उद्देशाने या शिबीराचे आयोजन केले आहे. बार्शी तालुक्यातील बेरोजगारी कमी व्हावी या उद्देशाने यापुर्वी मोफत पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. तसेच रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशानेच न्यायालयीन लढा देवुन संतनाथ साखर कारख्यान्याची लिलावात होणारी विक्री रोखली होती. व कारखान्याच्या पुर्नरूज्जीवनासाठी प्रयत्न सुरू केले. तालुक्यातील राजकारणात युवकांच्या हातांना काम मिळत नाही. बार्शीत मोठे उद्योग नाहीत त्यामुळे बार्शीतील प्रस्थापित नेत्यांनी युवकांना वाम मार्गाला लावले राजकीय पोळी भाजुन घेण्यासाठी युवकांचा निवडणुकीपुर्ता गैरवापर झाला. त्यामुळे अशा पोळलेल्या युवकांना सन्मार्गावर आणण्यासाठी अशा शिबीरांचे आयोजन केले असल्याचेही मिरगणे यांनी यावेळी सांगितले. 
यावेळी बोलताना शिवसेना नेते भाऊ साहेब आंधळकर यांनी राजेंद्र मिरगणे यांच्या उपक्रम शिलतेचे कौतूक करत मिरगणे यांनी राजकारणात समाजकारणाला प्राधान्य दिले. मोफत पाणी पुरवठा पासून शेतकर्‍यांना बियाणे वाटपापर्यंत आणि शेती व नोकरी विषयक मार्गदर्शन केंद्रापासून जलसंधारण पॅटर्नपर्यंत अनेक विधायक उपक्रम मिरगणे यांनी राबविल्याचे आंधळकर यांनी सांगितले. तसेच बार्शीच्या राजकारणात भविष्यात मिरगणे, आंधळकर जे ठरवतील तेच होणार आहे. मिरगणेंबरोबर जोडलेले जिवाभावाचे नाते हे गेल्या जन्मीचे ऋणानुबंध आहेत. आगामी काळात कितीही संकटे आले तरी मिरगणेंची साथ सोडणार नाही. असे सांगितले.
यावेळी प्रास्ताविकामध्ये शिवाजीराव पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून बार्शी तालुक्यात मराठा समाजाने उभारलेल्या लोक लढ्यात मिरगेंनी मोठे योगदान दिले. अशे शासन दरबारी या प्रश्नाबाबत समाजबांधवाशी समन्वय वसुसंवाद साधण्यासाठी प्रयत्न केले.मिरगणे यांनी तण, मन, धनाने सर्व समाजघटकांसाठी केलेले सेवाकार्य उल्लेखनीय आहे. मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीरातून तालुक्यात भरतीसाठी सक्षम चांगले अधिकारी व कर्मचारी निर्माण व्हावेत हा शिबीराचा उद्देश असल्याचे सांगितले. यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सौ.पद्मजा काळे, जिल्हाउपाध्यक्षा सौ.अश्विनीताई बुडुख, तालुकाध्यक्ष सुनंदा जावळे, तालुकाध्यक्ष बिभीषन पाटील, शहराध्यक्ष अश्विन गाढवे, भाजयुमो तालुकाध्यक्ष नाना पाटील, शहराध्यक्ष महेदिमियॉ लांडगे, माजी नगरसेवक विनोद वादी आदी उपस्थित होते.
शिबीराच्या यशस्वीतेसाठी विजयसिंह देशमुख, बाळासाहेब पवार, शिरीष घळके, बापू कदम, अविनाश शिंदे, अतिष बिसेन, संदीप देशमुख, बंडु मिरगणे, अमर आवटे, बाबा शेख, सुशांत गायकवाड, रविंद्र सांगोळे यांनी परिश्रम घेत आहेत.
कार्यक्रमापुर्वी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे व शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या समोरील छत्रपती शिवराय व कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करून प्रमुख मार्गावरून कार्यकर्त्यांनी भव्य रॅली काढली. या रॅलीत शेकडो मोटारसायकलस्वार भाजपा शिवसेनेचे पक्षीय झेंडे लावुन सहभागी झाले होते.
 

ग्लोबल न्युज नेटवर्क: