गृहमंत्री देशाची दिशाभूल का करत आहेत? म्हणत, असदुद्दीन ओवेसी अमित शाहांवर भडकले

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय नागरिक नोंदणी रजिस्टर (एनपीआर) अद्ययावत करण्यास मान्यता दिली. यावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी विरोध दर्शवत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एनपीआर आणि एनआरसीवर केलेल्या विधानावर टीका केली आहे.

असदुद्दीन ओवैसी माध्यमांना सांगितले की,’ गृहमंत्री देशाची दिशाभूल का करत आहे ? अमित शहा यांनी संसदेत म्हंटले होते,’ एनआरसी संपूर्ण देशात लागू होणार, मात्र अमित शाह साहब जो पर्यंत सूर्य पूर्वेकडून उगवत राहील आम्ही तो पर्यंत खरेच बोलू असं म्हणत त्यांनी अमित शाह यांच्यावर खोचक टीका केली.

 असदुद्दीन ओवेसी यांनी सीएए, एनआरसीसोबतच एनपीआरला सुद्धा विरोध दर्शविला आहे. त्यांनी अमित शाह यांच्यावर देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. बुधवारी हैदराबादमध्ये पत्रकारांशी बोलाताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “एनपीआर आणि एनआरसीमध्ये काहीच फरक नाही. केंद्रीय गृहमंत्री देशाची दिशाभूल करत आहेत.

सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन याविरोधात आंदोलन करणार आहेत. गृहमंत्रालयाच्या चालू वर्षाच्या अहवालाचा हवाला देत ओवेसी म्हणाले, “मी याच्याशी सहमत आहे की, अमित शाह माझ्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत. त्यांनी गृह मंत्रालयाच्या वार्षिक अहवालातील 15 वा मुद्दा वाचायला हवा. त्यातील चार क्रमांकाचा मुद्यामध्ये ते स्वतः सांगत आहेत की, एनपीआर एनआरसीच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल असेल,असं त्यांनी सांगितलं आहे, ” असंही ओवेसी यांनी सांगितलं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: