खमके मावळे साहेबांच्या पाठिशी आहे तोपर्यंत राष्ट्रवादी संपणार नाही, मुंडेंचा पाटलांना टोला 

मुंबई |  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी संपवणार असे वक्तव्य केले होते. आता त्यांच्या या वक्तव्याला विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंनी उत्तर दिले आहे. आमच्या सारके खमके मावळे साहेबांच्या पाठिशी आहेत तोपर्यंत राष्ट्रवादी संपणार नाही असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत 

आगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपच्या मेगाभरतीने अनेकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडत सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

धनंजय मुंडे म्हणाले की, ‘भाजपचे अध्यक्ष म्हणतात भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला संपवून टाकणार. आमच्या सारखे खमके मावळे पवार साहेबांच्या पाठिशी आहेत तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे, आदरणीय पवार साहेबांचे विचार संपणार नाहीत’ पुढे मुंडे म्हणाले की, खुल्या मतदारसंघातून मागासवर्गीय समाजाचा उमेदवार निवडून येईल तेव्हा भारतात समता प्रस्थापित होईल असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. मला अभिमान आहे की पवार साहेबांनी प्रकाश आंबेडकर, गवई साहेब, कवाडे सर, आठवले साहेबांना खुल्या मतदारसंघातून निवडून आणले खरी समता प्रस्थापित केली.

मुख्यमंत्र्यांवरही केली टीका 

मुंडे पुढे म्हणाले की, ‘ज्यावेळी मराठा समाजाचे मोर्चे निघत होते तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले होते की हा प्रस्थापितांविरोधात विस्थापितांचा लढा आहे. समाजात फुट पाडण्याचे काम यांनी केले. आशा फुटीर वृत्तीच्या लोकांना आपल्याला सत्तेवरून हद्दपार करायचे आहे.’ 

मोदींच्या नाशिक सभेवरही साधला निशाणा 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या महाजनादेश यात्रेचा समावेश आज नाशकात झाला. यावेळी मोदींची सभा या ठिकाणी झाली. यावर टीका करत धनंजय मुंडे म्हणाले की, ‘तब्बल अडीच हजारहून अधिक पोलीस तैनात, सामान्य कार्यकर्त्यांची धरपकड, काळ्या कपड्यास बंदी, कांद्यास, शेतमालास, पिशव्या या सर्वांवर बंदी… छावणीचे स्वरूप आले आहे नाशकात. आणि म्हणे सर्वात मोठ्या लोकशाही देशातील पंतप्रधानांचा दौरा आहे. वाव्वा! मोदी साहेब मानलं तुमच्या निधड्या छातीला.’

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: