खबर जगाची सकाळच्या हेडलाईन,अमेरिकेनंतर आता भारताने देखील अवकाश युद्धाची (स्पेस वॉर) केली तयारी

गुरुराज माशाळ

इंग्लंड : आरोपी नीरव मोदीचा रॉयल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये जामिनासाठी अर्ज; आज होणार सुनावणी.

जम्मू काश्मीरः सोपोर भागातील शैक्षणिक संस्था आज बंद ठेवण्याचा निर्णय; सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमक सुरूच, एका घरात तीन दहशतवादी लपल्याची माहिती.

नवी दिल्ली: अमेरिकेनंतर आता भारताने देखील अवकाश युद्धाची (स्पेस वॉर) केली तयारी; सैन्याचं सामर्थ्य वाढवण्यासाठी सरकारनं नव्या संस्थेच्या स्थापनेला दिली मंजुरी.

नवी दिल्ली : कांदा निर्यातीवर मिळणारे 10 टक्के अनुदान केंद्र सरकारने काढून टाकल; भविष्यात निर्यातीवर विपरीत परिणाम होऊन बाजारभाव पुन्हा कोसळण्याची शक्यता.

नवी दिल्ली : माजी नागरी उड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेला यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना; ईडीकडून मंगळवारी ९ तास चौकशी.

बंगळुरू : फेसबुक लाईव्ह दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांच्याविरोधात अर्वाच्य भाषा वापरणे पडल महागात; या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी दोघांना केली अटक.

अहमदाबाद : विमान अपहरणाची अफवा पसरवणं पडलं महागात; ज्वेलरी व्यवसायिकाला अपहरणाची खोटी बातमी पसरवल्याबद्दल विशेष एनआयए न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

मुंबईः दादर येथील चैत्यभूमीत अखंड भीमज्योत उभारण्यास राज्य शासनाची मंजुरी.

मुंबई : अकरावी प्रवेशाठी सीबीएसई, आयसीएसई विद्यार्थ्यांचे केवळ लेखी परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्याबाबत मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी चर्चा करणार, विनोद तावडे यांचा एसएससी विद्यार्थ्यांना दिलासा.

मुंबई : बिग बींवरील सायबर हल्ल्याला भारतीयांचं उत्तर, पाकिस्तानच्या 5 वेबसाईट्स हॅक; पेज ओपन करताच वंदे मातरम् आणि माँ तुझे सलाम ही गाण ऐकावलं.

नागपूर : चार वर्षीय बालिकेवर अत्याचार, चौकीदारीचे काम करणाऱ्याला अटक; पीडित मुलगी शाळेच्या आवारात खेळत असताना आरोपीने मुलीसोबत केला अत्याचार.

सोलापूर पालिकेत पाणी पुरवठ्यावरुन खडाजंगी, भाजप आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक.

सोलापूर : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १४ जूनला होणार असल्याची सूत्रांची माहिती; रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा मंत्रीमंडळातील प्रवेश नक्की.

सांगली :सांगलीच्या 11 वर्षांच्या उर्वी अनिल पाटील या चिमुरडीने हिमालयातील पीरपंजाल रेंजमधील 14 हजार 400 फुटांवरील ‘हमता पास’ केला सर; कमी वयात ‘हमता पास’ सर करणारी उर्वी पाटील पहिली महाराष्ट्रीयन कन्या.

इंग्लंड : वर्ल्डकप स्पर्धेत ब्रिस्टॉल येथील बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना पावसामुळे रद्द; वर्ल्डकप स्पर्धेत पावसामुळे रद्द झालेला हा तिसरा सामना.

धिरज करळे: