खबर जगाची सकाळच्या हेडलाईन,आज होणार राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार

वृत्तसंकलन: गुरुराज माशाळ

बडोदा : गुजरातच्या बडोद्यामध्ये एका हॉटेलच्या सेप्टिक टॅंकची साफसफाई करताना गुदमरून सात कामगारांचा दुर्दैवी मृत्यू; चार सफाई कर्मचाऱ्यांसह अन्य तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने बडोद्यामध्ये खळबळ.

पाटना : बिहारमधील मुजफ्फरपूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये चमकी तापेचा कहर; चमकी तापमुळे 69 बालकांचा मृत्यू झाला आहे. मुजफ्फरपूर येथील सिव्हिल सर्जन डॉ. शैलेष प्रसाद सिंह यांनी दिली माहिती.

मुंबई : रामराजेंच्या टीकेनंतर उदयनराजेंचा रुद्रावतार, शरद पवारांसोबत बैठक अर्ध्यावर सोडून उदयनराजे बाहेर.

मुंबई : आज होणार राज्यमंत्री मंडळ विस्तार, शपथविधीला मराठवाड्यातले शिवसेनेचे आमदार गैरहजर राहणार; प्रकाश मेहतांसह तिघांना मंत्रिमंडळातून डच्चू, आशिष शेलार, योगेश सागर,अतुल सावे यांना संधी.

सातारा : उदयनराजेंच्या विरोधात रामराजे समर्थक आक्रमक, उदयनराजेंच्या विरोधात घोषणा देत निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंदची

सोलापूर : सहकार मंत्री सुभाष देशमुखांची प्रदूषण मुक्तीसाठी सायकलवरून प्रवास; प्रदूषण मुक्तीसाठी आठवड्यातून एक दिवस सायकल प्रवास करण्याचा आवाहन.

सोलापूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या बीड येथील चार जणांना अटक; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई.

इंग्लंड : क्रिकेट चाहत्यांना मोठी पर्वणी; भारत-पाकमध्ये आज महामुकाबला; पाकड्यांची नांगी ठेवण्यासाठी टीम इंडिया सज्ज.

इंग्लड: दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तान वर ९ गडी राखून विजय.

धिरज करळे: