काँग्रेस च्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे निधन

दिल्ली: काँग्रेसच्या नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे शनिवारी निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. दिल्लीमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अजय माकन यांनी दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीवेळी शीला दीक्षित यांच्याकडेच दिल्लीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना या महानगरात विकासाची अनेक कामे हाती घेण्यात आली होती. दिल्ली मेट्रोचा विस्तार, कॉमनवेल्थ गेम्सच्या निमित्ताने झालेली विकासकामे यावेळी शील दीक्षितच दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. गांधी कुटुंबियांशी त्यांचे चांगले संबंध होते. काही दिवसांपूर्वीपर्यंत त्या पक्षाच्या कामात सक्रिय होत्या. काही दिवसांपूर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांची भेट घेतली होती.

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सदस्य असताना त्या स्पष्टपणे आपली भूमिका मांडत होत्या. लोकसभेतही त्यांनी काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले होते

ग्लोबल न्युज नेटवर्क: