कसा असेल हा आठवडा आपल्यासाठी जाणून घ्या सविस्तर

साप्ताहिक राशीभविष्य; 14 ते 20 जुलै 2019

मेष – खरेदीचा योग : मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. त्या दृष्टीने आठवडा महत्त्वाचा आहे. कार्यालयात कामाचा प्रचंड ताण पडेल. जबाबदारी टाळू नका. खरेदीच्या व्यवहारात जोडीदाराचे मत महत्त्वाचे ठरेल.

वृषभ – नवीन वळणावर : विवाह योग आहे. चांगली स्थळे येतील. गांभीर्याने विचार करा. हरिपाठाचे अभंग आवर्जून ऐका. घरात सकारात्मक वातावरण राहील. विचारांनाही चांगले वळण लागेल.

मिथुन – वरिष्ठांची मर्जी : घरात बारीक सारीक कुरबुरी होतील. नोकरीच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कार्यालयीन गप्पांपासून लांब राहा.

कर्क – यश तुमचेच : शांतपणे आपले काम करीत राहणे हा तुमच्या राशीचा स्वभावधर्म. केवळ आपल्या कामावर लक्ष द्या. यश तुमचेच आहे. न्यायालयीन कामे मार्गी लागतील.

सिंह- पैसा येईल: घरातील लहान मुलांसाठी वेळ काढाल. त्यामुळे घरातील वातावरण चांगले राहील. व्यवसायाच्या ठिकाणी प्रयत्नार्थी परमेश्वर हा प्रत्यय येईल. प्रयत्नांची कास सोडू नका. प्रलंबित कामे मार्गी लागतील. अनपेक्षित धनलाभ होईल.

कन्या- लाभदायक आठवडा : तुमच्या क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. व्यवसायात जम बसेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल.नवविवाहितांसाठी काल उत्तम. बाहेर जाऊन या. मनाने जवळ याल. व्यवसायात यश लाभेल. घरातील लहानांवर ओरडू नका. काळजी घ्या.

तूळ – नवी संधी : उद्योगधंद्यात नवी संधी मिळेल. नोकरीत कामाचा व्याप राहील.मैत्रीत दुरावा येईल. वाद वाढवू नका. कुटुंबात नाराजी होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मनावर दडपण येईल.

वृश्चिक – आनंदी वातावरण: घरात दुरुस्तीची कामे निघतील. श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता. घरात मोगऱयाची फुले ठेवा. त्याच्या सुगंधाने घरात पवित्र वातावरण निर्माण होईल. पांढरा रंग यश देणारा ठरेल. आप्तस्वकियांच्या गाठीभेटी होतील. त्यातून आनंदी वातावरण निर्माण होईल.

धनु- गुंतवणूक करा : समीकरणे जुळतील. तुमचे महत्त्वाच्या गोष्टींबाबत आराखडे अचूक ठरतील. स्वतःच्या आत्मशक्तीवर विश्वास ठेवा. वादात सापडू नका. घरातील वातावरण सुधारेल. जमिनी खरेदी व्यवहार फायदेशीर ठरू शकतात.

मकर- निर्विघ्न कार्य: आर्थिक प्राप्ती उत्तम होईल. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होईल. आर्थिक व्यवहार करताना राखाडी रंग जवळ बाळगा. देवघरात लक्ष्मीची मुद्रा असलेले नाणे ठेवा. त्याची रोज पूजा करा. कोणतेही कार्य निर्विघ्न पार पडेल.

कुंभ – जमिन खरेदी : अत्यंत व्यस्त आठवडा. कामानिमित्त प्रवास घडेल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. सात्विक आहार घ्या. घरातील क्लेशांपासून दूर राहा. उशीरपर्यंत घराबाहेर राहण्याचे टाळा. हितशत्रूंचा त्रास संभवतो. दुर्लक्ष करा.

मीन – सर्जनशील काम : प्रकृतीची काळजी घ्या. वरिष्ठ कामाचे कौतुक करतील. सर्जनशील काम हातून घडेल. जवळच्या माणसांच्या भेटीगाठी संभवतील. आठवडा मजेत जाईल. वस्तू खरेदीचा योग आहे. मन शांत ठेवा.

ग्लोबल न्युज नेटवर्क: