कलम 370: ज्योतिरादित्य शिंदेंचा काँग्रेसला घरचा आहेर, मोदी सरकारला पाठिंबा


दिल्ली: सोमवारी राज्यसभेमध्ये कलम 370 रद्द करण्याचे विधेयक मंजूर झाल्यानंतर मंगळवारी हे विधेयक लोकसभेमध्ये मांडण्यात आले. या विधेयकावर दीर्घ चर्चा झाली. यानंतर 366 विरुद्ध 66 मतांनी हे विधेयक मंजूर झाले. दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर झाले आहे. जम्मू-कश्मीरमधून कलम 370 करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये सरळ दोन गट पडले आहेत. काहींनी देशहितासाठी मोदी सरकारला पाठिंबा दिला, तर काहींनी याला विरोध केला आहे. काँग्रेसचे नेते खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनीही काँग्रेसला घरचा आहेर देत केंद्र सरकारला पाठिंबा दिला आहे.

खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्वीट करून मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे. मी जम्मू-कश्मीर, लडाख आणि हिंदुस्थानच्या एकत्रिकरणासाठी उचलेल्या पावलाचे समर्थन करोत. राज्यघटनेचे पालन करून हा निर्णय घेतला गेला असता तर यावर प्रश्न उपस्थित झाले नसते. परंतु तरीही देशहितासाठी मी याचे समर्थन करतो, असे ट्वीट ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले आहे.

राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांचे नावही चर्चेत आहे. असे असतानाही ज्योतिरादित्य शिंदे यांनी मोदींबा पाठिंबा देणारे ट्वीट केल्यानंतर काँग्रेसममध्ये खळबळ उडाली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह मिलिंद देवरा, दीपेंद्र हुड्डा, जनार्दन द्विवेदी यांनीही कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: