कर्नाटक : मुख्यमंत्री येडियुरप्पा विधानसभेत बहुमताची परीक्षा उत्तीर्ण

कर्नाटक  भाजपचे नवनियुक्त मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. आवाजी मतदानाने ही सर्व प्रक्रिया पार पडली. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष आर. रमेश यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या सर्व घडामोडींमुळे भाजपासाठी हे एक मोठे यश मानले जात आहे. बहुमत सिद्ध केल्यानंतर गेला महिनाभर सुरू असलेल्या कर्नाटकी  राजकीय नाट्याचा शेवट झाला आहे.

असे झाले बहुमत सिद्ध

जनता दल (सं.) आणि काँग्रेस यांच्या १७ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवल्याने जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारचे संख्याबळ कमी झाले. याचा फायदा भाजपाला झाला. आमदार अपात्र ठरवल्याने बहुमताचा आकडा आता १०५ वर आला होता. नव्या समीकरणानुसार, भाजपालाही सत्ता स्ठापनेसाठी एवढ्याच सदस्यांच्या समर्थनाची आवश्यकता होती. भाजपाकडे एवढे संख्याबळ असल्याने त्यांना आणखी कोणाची आवश्यकता नव्हती. त्यामुळे येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यात कोणतीच अडचण नव्हती. या घडामोडींमध्ये विरोधी पक्षांकडून मतदानाची मागणी करण्यात आली नाही. त्यामुळे सरकारसमोरील आणखी एक आव्हान दूर झाले. आता येडियुरप्पा सरकारने आगामी कामकाजाला सुरुवात केली आहे.

बहुमत सिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. मी कोणाचाही बदला घ्यायचा या राजकारणातून काम करत नाही. त्यामुळे आताही करणार नाही. आमचे सरकार शेतकऱ्यांसाठी काम करू इच्छीते. यासाठी मी सर्वांना आवाहन करतो की, सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाचे समर्थन करा.

– बी.एस. येडियुरप्पा, मुख्यमंत्री

ग्लोबल न्युज नेटवर्क: