ऐतिहासिक! दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांनी केले राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

दिल्ली: भारतीय लोकशाही च्या सर्वोच्च संसदेमध्ये सर्वपक्षीय मंत्री- खासदारांनी ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची’ जयंती साजरी केली.

शाहू महाराजांचा वंशज या नात्याने खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केलेल्या विनंती ला मान देऊन महाराजांना अभिवादन करण्यासाठी केंद्रीय मंत्री आणि खासदार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.

त्यामध्ये,
संभाजीराजे चे बंधू श्रीमंत छत्रपती उदयनराजे, महाराष्ट्राचे जेष्ठ नेते खा.शरद पवार , केंद्रीय मंत्री अरविंद सावंत ,रावसाहेब दानवे, अनुराग ठाकूर, रामदास आठवले , संजय धोत्रे , विनय सहस्रबुद्धे , माजी मंत्री सुभाष भामरे , छत्तीसगढ़ चे माजी मंत्री राम विचार नेताम , काँग्रेस पक्षाचे वरीष्ठ नेते दिग्विजय सिंह , प्रतापसिंह बाजवा , कुमार केतकर , हुसेन दलवाई , बहुजन समाज पार्टी चे अशोक सिद्धार्थ , अपना दल च्या प्रमुख अनुप्रिया पटेल , ‘डी एम के’ चे तिरूची शिवा,

भाजप चे माजी मंत्री आणि खासदार गिरीश बापट , गोपाळ शेट्टी , प्रतापराव पाटील चिखलीकर , हीनाताई गावित, प्रीतमताई मुंडे, डॉ भारतीताई पवार , रक्षाताई खडसे , डॉ विकास महात्मे , नरेंद्र जाधव , मनोज कोटक , राजेंद्र गावित , कपिल पाटील , सुधाकर शृंगारे यांच्याबरोबर

शिवसेनेचे वरिष्ठ नेते विनायक राऊत , श्रीकांत शिंदे , राहुल शेवाळे , संजय मंडलिक , प्रतापराव जाधव , हेमंत अप्पा गोडसे , श्रीरंग अप्पा बारणे , ओमराजे निंबाळकर , धैर्यशील माने.

राष्ट्रवादी पक्षाचे माजी अध्यक्ष खा. सुनील तटकरे , सुप्रियाताई सुळे, डॉ अमोल कोल्हे आदी देश आणि राज्यातील मान्यवरांनी संभाजीराजे यांच्या विनंती ला मान देत शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले.या सर्वांचे राजेंनी आभार मानले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: