“उदयनराजेंच्या बालिश चाळ्यांना पवारांनी नेहमीच पाठीशी घातले”

उदयनराजे भोसले यांनी अमित शाह यांच्या उपस्थित दिल्लीमध्ये शनिवारी भाजपात प्रवेश केला. उदयनराजे यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मी उदयनराजेंना नेता मानत नसल्याचे आव्हाड यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. उदयनराजे भोसले यांच्या बालिश चाळ्यांना शरद पवार यांनी नेहमीच पाठीशी घातले. पवारांचा त्यांच्यावर जीव होता, पण उदयनराजेंनी पवारांना काय दिले? अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशानंतर ट्विट करतही जितेंद्र आव्हाड यांनी तोफ डागली आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले की, ‘साहेब, उदयनराजेंवर तुम्ही मनापासून प्रेम केलं. साताऱ्यातील जवळच्या सहकाऱ्यांना दुखावलंत. त्यांच्या सगळ्या आचरट बालिश चाळ्यांना पाठिशी घातलंत. त्यांच्यावर पोटच्या पोरासारखं प्रेम केलंत. साहेब काय मिळालं?’

भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपामद्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे आणि रामदास आठवले यांची उपस्थिती होती. भाजपाप्रवेशावेळी बोलातना उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या कामाचे कौतुक केले. लोकशाहीला मजबूत करण्याचे काम मोदी आणि शाहांच्या नेतृत्वात भाजपा करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: