‘इंग्लिशमध्ये सांगू काय’ म्हणणाऱ्या ‘आर्ची’ला इंग्रजीत किती मार्क मिळाले, 82 टक्के घेत रिंकू बारावी पास

मुंबई : पुणे बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल आज घोषित करण्यात आला. या परीक्षेत सैराटच्या आर्चीला अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरूला 650 पैकी 533 गुण  मिळाले आहेत. मराठीत सांगितलेलं कळत  नाही का? इंलिशमध्ये सांगू काय असं म्हणणाऱ्या आर्चीला बारावी परीक्षेत इंग्रजी विषयात कमी म्हणजे 54 मार्क मिळाले आहेत.

रिंकू राजगुरूला मराठीत 86, भूगोल विषयात तब्बल 98, इतिहास विषयात 86, राज्यशास्त्र विषयात 83, अर्थशास्त्र विषयात 77 तर पर्यावरण स्टडी विषयात 49 गुण  मिळाले आहेत. तिला एकूण सात विषयात 650 पैकी 533 गुण  मिळाले आहेत. तिला सरासरी 82 टक्के मार्क मिळाले आहेत.

बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 85.88 टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 2.53 टक्क्यांनी निकाल कमी लागला आहे. मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे ही प्रेस काॅन्फरन्स यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहता येईल.

admin: