आयटी रिटर्न भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढ निर्मला सीतारामन यांची घोषणा

सीतारामन यांची घोषण आयटी रिटर्न भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढ

कोरोना विषाणूशी लढत असलेल्या अर्थव्यवस्थेला आर्थिक पॅकेजचे बुस्टर देण्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी पत्रकार परिषद घेत आर्थिक पॅकेजवर काम सुरु असून लवकरच त्याची घोषणा केली जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

काही महत्त्वाच्या घोषणा पुढीलप्रमाणेः

🔹५ कोटींची उलाढाल असलेल्या कंपन्यांसाठी जीएसटी रिटर्न भरण्यास उशीर झाल्यास सध्या दंड नाही.

🔹टी़डीएसवरील व्याज १८ टक्क्यांवरुन ९ टक्के करण्यात आले आहे.

🔹३० जून २०२० पर्यंत २४ तास कस्टम क्लियरन्सची सुविधा मिळत राहिल.

🔹मार्च, एप्रिल, मे महिन्यातील जीएसटी रिटर्न भरण्याची तारीखही ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली.

🔹विवाद ते विश्वास ही योजनाही आता ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. ३१ मार्च ते ३० जून या कालावधीत कोणतेही अतिरिक्त शूल्क द्यावे लागणार नाही.

🔹आधार- पॅन कार्डशी लिंक करण्याची अखेरची मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढवण्यात आली. पूर्वी ती ३१ मार्चपर्यंत होती.

🔹आर्थिक वर्ष २०१८-१९ चा प्राप्तिकर परतावा भरण्याची अखेरची तारीख वाढवून ३० जूनपर्यंत करण्यात आली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: