आम आदमी पक्ष पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभेच्या रिंगणात, 8 उमेदवार केले जाहीर

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे शंख वाजल्यानंतर पसर्वच पक्षाने आपली तयारी सुरू केली आहे. दिल्ली, पंजाब मध्ये यश मिळवलेल्या आम आदमी पक्षाने पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेत विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

आपने आपली पहिली यादी जाहीर केली. आपचे महाराष्ट्र सहप्रभारी किशोर मधन, आपच्या महाराष्ट्र संयोजिका प्रीती मेमन, सचिव धनंजय शिंदे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन 8 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.

आपची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील 8 उमेदवारांची यादी…

🔹पारोमिता गोस्वामी – ब्रह्मपुरी विधानसभा

🔹विठ्ठल गोविंदा – जोगेश्वरी पूर्व

🔹आनंद गुरव – करवीर विधानसभा (कोल्हापूर)

🔹विशाल वडघुले – नांदगाव (नाशिक)

🔹 डॉ. अभिजीत मोरे – कोथरूड विधानसभा (पुणे)

🔹सिराज खान – चांदोली विधानसभा (मुंबई)

🔹दिलीप तावडे – दिंडोशी विधानसभा (मुंबई उपनगर)

🔹संदीप सोनवणे – पर्वती विधानसभा (पुणे)

‘आप महाराष्ट्रात 50 जागा लढवणार’

आपच्या महाराष्ट्र संयोजक प्रीती मेनन यांनी आप महाराष्ट्रात 50 जागा लढवण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. मेनन म्हणाल्या, “विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी महाराष्ट्रातून 600 ते 700 अर्ज आले होते. मागील 10 दिवसात आम्ही 600 उमेदवारांचे अर्ज घेतले. अंतिमतः या सर्व अर्जांची तपासणी आणि अभ्यास करुन यादी तयार करण्यात आली आहे. आप महाराष्ट्रात 50 ते 55 जागा लढवणार आहे.”

वंचित सोबत बोलणी सुरू’

आपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याबाबत बोलणी सुरू असल्याचंही नमूद केलं. मेनन म्हणाल्या, “वंचितचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार चळवळीचे कार्यकर्ते होते. त्यामुळे जर चांगले लोक राजकारणात येत असतील, तर त्यांच्यासोबत जायला काहीच हरकत नाही. म्हणूनच आम्ही वंचित सोबत जाऊ. वंचितसोबत गेल्यास कोणत्या जागा कुठे सोडायच्या यावर चर्चा सुरू आहे. वंचित आमच्यासोबत येत असेल, तर आम्ही तयार आहोत.”

आपची लढाई सामान्य (आम) लोकांसाठी आहे. लोकांच्या समस्या विधानभवनात पोहोचल्या नाहीत. हे सर्व पक्ष एक आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात लढत आहोत. जनतेचा आवाज, महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी ‘आप’ ही निवडणूक लढेल, असंही मेनन यांनी सांगितलं.

, “आमच्या पक्षात कुणी राजकारणी नाही. सर्वजण सर्वसामान्य आहेत. सर्वसामान्यांचा आवाज दबलेला आहे. त्याविरोधात आम्ही लढू. शहरातील महत्वाचे मुद्दे आम्ही हातात घेऊ. मुंबईतील आरेच्या विषयावर आम्ही रस्त्यावर लढू.”असे प्रीती मेमन म्हणाल्या.

ग्लोबल न्युज नेटवर्क: