आम्ही मंजूर कामांचीच उदघाटन करतो,कोणते काम बोगस आहे हे विरोधकांनी सिद्ध करून दाखवावे’ : राजेंद्र राऊतांचे आव्हान

बार्शी : शहराच्या विकासासाठी पालिकेच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न सुरू असून भाजप सरकारकडून आजपर्यंत कोट्यवधींचा निधी खेचून आणला असून मंजूर कामांचीच उदघाटन करतो आहे. कोणते काम बोगस आहे हे विरोधकांनी सिद्ध करून दाखवावे असे आव्हान माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी दिले. बांधकाम सभापती विजय राऊत यांच्या सन्मानार्थ अलीपुर रस्त्यावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, रमेश पाटील, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, नगरसेवक विजय राऊत, बाजार समिती संचालक रावसाहेब मनगिरे, माजी शिक्षण सभापती पांडुरंग गव्हाणे आदी उपस्थित होते.

यावेळी राऊत म्हणाले, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे एमआयडीसीच्या विकासासाठी मदत मागितली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे बार्शी बसस्थानक इंदापूरच्या धर्तीवर, व्यापारी संकुल उभारून सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव दिला. पण शिवसेनेच्या या दोन्ही नेत्यांनी बार्शीच्या विकासकामांसाठी कसलीच मदत केली नाही. शिवसेनेकडून काम होत नसल्यामुळेच भाजपात प्रवेश केला. कोट्यवधींचा निधी भाजपा सरकारने दिला. शहरात भव्य स्टेडियम, रस्ता रुंदीकरण, पाणी टंचाईच्या काळात ६४ बोअर मारून पाणी पुरवठा, सुभाषनगर, सोलापूर रस्ता, टिळक चौक येथे व्यापारी संकुलाची निर्मिती, कासारवाडी रस्त्याला हरित क्षेत्र विकास, जुन्या उद्यानांचे सुशोभीकरण आदी कामे केली. शहराची भविष्यातील सन २०५० ची गरज लक्षात घेवून पाणीपुरवठ्याच्या आराखडा तयार केला असून, गणेश तलावाचा वॉटर पार्क करणार असल्याचे सांगितले.

वर्क ऑर्डर खिशात असल्याशिवाय कार्यक्रमाला जात नाही : नगराध्यक्ष तांबोळी

कोणत्याही विकासकामांची वर्क ऑर्डर खिशात असल्याशिवाय मी कार्यक्रमाला जात नाही असे नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांनी सांगितले.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: