आमच्या विरोधकांची पक्ष बदलाची कारणे ऐकून गंमतच वाटते: दिलीप सोपलांची टीका

बार्शी: ज्या शिवसेनेने ध्यानीमनी नसतांना विरोधकाला आमदारकीचे न बघितलेले स्वप्न पूर्ण केले त्यांनी काँग्रेसमध्ये जावून काय विकास केला, तिथे तरी निट संसार केला का, पुन्हा शिवसेनेत घेतलेल्यांनी सहा महिन्यात पुन्हा पक्षाला टांग मारली. पक्ष बदलतांना अशी कारणे सांगतात की त्याची गंमतच वाटते, त्यांना मातोश्री बाहेर गटारांवर डासांत उभा केल्याचे सांगीतले प्रत्यक्षात त्या ठिकाणी मी पाहिल्यावर अशी ऐतिहासिक गटारच अस्तित्वात नव्हती. बंद भुयारी गटारी असलेल्या मुंबईत यांना कुठून उघड्या गटारी दिसल्या काय माहित अशी टीका शिवसेना नेते दिलीप सोपल यांनी केली.

निवडणूक आली की विरोधकांकडून गाडीत पाटी, खोºया, टिकाव आणि नारळाचे पोते ही तिसरी निवडणूक मी पाहतोय, २००९ ला ही असेच केले त्यावेही काँग्रेसमध्ये होते, शिवसेनेत असतांना गोरगरिबांचे प्रतिनिधीत्व म्हणून लोकांची कामे विसरूनच गेले अशी टिका सोपल यांनी विरोधकांवर केली.


माजी नगरसेवक शशिकांत गव्हाणे, मराठा महासंघाचे शहराध्यक्ष सूरज गव्हाणे, सुमित बारंगुळे आदींनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला याप्रसंगी ते बोलत होते.  अलीपूर रोड येथे हा कार्यक्रम पार पडला.

आ़ दिलीप सोपल यांच्या प्रवेशाने शिवसेनेत पुन्हा नवचैतन्य आल्याचे दिसत आहे. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. तानाजी सावंत यांनी सेनेची सूत्र हाती घेतल्यानंतर चांगले परिवर्तन झाले आहे. माझे जेवढे वय तेवढा तुमचा विधानसभेच्या कामाचा अनुभव आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते हे जीवाचे रान करणारे गरिब असल्याने त्यांना आता न्याय मिळेल असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी व्यक्त केला.

वानकर म्हणाले, ज्या दिवशी शिवबंधन बांधले तेव्हाच जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी तुम्हाला स्विकारले आहे. भविष्यात तुम्हाला कोणताही पक्ष बदलण्याची गरज पडणार नाही. अकरा तालुक्यांपैकी मंत्रीपदासाठी शिफारस करण्याजोगे केवळ सोपल हेच एकमेव आहेत.

 अध्यक्षपदी अरूण दिक्षीत हे होते़ यावेळी आ़ दिलीप सोपल,  जिल्हा उपप्रमुख देवा दिंडोरे, तालुका प्रमुख अमोल काकडे, नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, युवराज काटे, श्रीमंत थोरात, संतोष गुंड, सुशांत चव्हाण, आबा राउत, नचिकेत गोंदील, अजित बाबर, मनिष चौहान, नंदकुमार काशीद, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, माजी नगराध्यक्ष गणेश जाधव, अ‍ॅड.विकास जाधव, किशोर गोंडगिरे, युवानेते आर्यन सोपल, नगरसेवक विलास रेणके, आबाजी पवार, मंगलताई पाटील, मंगल शेळवणे, मंदाताई काळे, संगीता मेनकुदळे, अरूणा परांजपे, वर्षा रसाळ, कल्याणी बुडूख, करूणा हिंगमिरे, मिना धर्माधिकारी, आदी उपस्थित होते.

यांचा झाला प्रवेश

माजी नगरसेवक शशिकांत गव्हाणे, मराठा महासंघाचे शहराध्यक्ष सूरज गव्हाणे, सुमित बारंगुळे, नवनाथ चोबे, जावेद मोगल, राजेंद्र जगताप, दिलीप सरवदे, परशुराम गव्हाणे, उमेश रणदिवे, सचिन कोकाटे, गणेश झांबरे, दिपक मोरे, धीरज निंबाळकर, आकाश गव्हाणे, शंकर नवले, नितीन चव्हाण, किरण गव्हाणे, लक्ष्मण ठोंगे, प्रविण गव्हाणे, अतुल भड, गणेश गव्हाणे, केतन वाडकर, अनिकेत बारंगुळे, रोहित धस पाटील आदींनी जाहीर प्रवेश केला. 

सोबत फोटो केला आहे़

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: