आमच्या घराला दत्तकची गरज नाही आमचा बाप भक्कम, शरद पवारांनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार

नाशिक । आमच्या घराला दत्तकची गरज नाही, आमचा बाप भक्कम आहे, असे सांगत नाशिकच्या दत्तक बापाला आता घरी पाठवा अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘नाशिक दत्तक’ घोषणेचा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी समाचार घेतला.

सन 1985 साली पुलोदचे 12 आमदार नाशिक जिल्ह्याने निवडून दिले. आता पुन्हा राष्ट्रवादीला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले. या सभेत त्यांनी नाशिकच्या औद्योगिक व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरले. कारखाने बंद पडत आहेत. बेरोजगारी वाढली आहे. एचएएलसारखा विमाननिर्मिती कारखाना नाशिकला मिळाला. त्यात विमान निर्मिती करण्याची गरज असताना, राफेलला काम दिले गेले. कमतरता असेल तर त्यात सुधारणा करून विमान एचएएलमध्ये निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. सहा महिन्यांचे पगार या कामगारांचे थकवले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. यासाठी का सरकार तुमच्या हाती दिले? असा प्रश्नही केला.

दरम्यान, देशाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणा-या कामगारांना सरकारला न्याय देता येत नाही. ही बाब दुर्दैवी असून देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र प्रामाणिकपणे काम करणा-या एचएएल कामगारांनी कधीही इतकी टोकाची भूमिका या पूर्वी घेतली नव्हती. निवडणुका झाल्यानंतर देशभरातील एचएएल कामगार संघटनांच्या निवडक प्रतिनिधीसह आपण स्वत केंद्रीय संरक्षणमंत्री यांची भेट घेऊन कामगारांचा वेतनकरारवाढीचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली.

देशाची सेवा करणा-या कामगारांना सरकारला न्याय देता नाही. केंद्र सरकारने अनुकूल निर्णय न घेतल्यानेच आज उद्योग क्षेत्राची अवस्था वाईट झाल्याचा आरोप करून आपन संरक्षणमंत्री असतांना एचएएलला किती वर्षे काम मिळेल याचा अभ्यास करूनच विमान उत्पादनाची क्षमता असलेल्या एचएएलला काम दिल्याचे सांगितले. गेल्या काही वर्षात एचएएलसह उद्योग क्षेत्रात कामगारांची संख्या सातत्याने कमी होतेय, परंतू अधिका-यांची संख्या वाढतीय हे अनुकूल नसल्याचे सांगत एचएएल कामगारांची मागणी रास्त असून यासाठी विधानसभा निवडणुकीनंतर आपण व्यक्तीशः यात लक्ष घालणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: