आदर्श समाज निर्मिती हे शिक्षणाचे घ्येय : प्रा. तुकाराम मस्के ,भगवंत व्याख्यानमाला बार्शी

बार्शी : समाज व्रवस्थेने निर्माण केलेल्रा जात, वर्ग, वर्ण रासारख्रा भेद आणि विषमतेवर मात करुन समाजाचा शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक विकास घडवत आदर्श समाज आणि संस्कृती निर्माण करणे, हेच शिक्षणाचे अंतिम ध्येय आहे. असे प्रतिपादन प्रा. तुकाराम मस्के रांनी केले. भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि मातृभुमी प्रतिष्ठान यांच्या संयुक्तविद्यमाने ग्रामदैवत भगवंत जयतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत शिक्षण, समाज आणि संस्कृती रा विषयावर ते बोलत होते. यावेळी  संयोजक संस्थांचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, ज्येष्ठ व्यापारी हंसराज झंवर हे अध्यक्षस्थानी होते यावेळी सराफ व्यवसायिक गोरख लोळगे,वैभव पाठकजयचंद सुराणा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रास्ताविकामध्ये मातृभुमीचे सचिव प्रताप जगदाळे यानी विविध उपक्रमांची माहिती देत भविष्यात शाळाबाह्य वंचित मुलांसाठी शैक्षणिक व रोजगारविषयक मदत करणारा प्रकल्प राबविणार असल्राचे सांगितले. 

प्रा. मस्के म्हणाले, माणुस आरुष्यभर शिकतच असतो. शिक्षणातून माणूस घडला पाहिजे. शिक्षणातून सुसंस्कार, सन्मार्ग मिळत नसेल तर ते शिक्षण व्रर्थ आहे. चांगले शिक्षण न मिळालेला समाज लयाला जातो. शिक्षणाचे सातत्राने परिक्षण झाले पाहिजे. शिक्षणातून राष्ट्रीर चारित्र्य निर्माण झाले पाहिजे. शिक्षणातून मूल्यव्रवस्था उभारली गेली तरच राष्ट्र टिकणार आहे.

एपीजे अब्दुल कलाम रांनी शालेय वर्ग हे राष्ट्र उभारणीचे केंद्र असते. व या छोट्या वर्गातूनच महासत्ता उदयाला रेते, असे म्हटले होते. दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्रांना मिळवून देण्याची जबाबदारी समाजाची पर्राराने शिक्षणसंस्थाचालक, पालक आणि शिक्षकांचीही आहे. शिक्षणामुळे मिळालेले ज्ञानामृत प्राशन केलेली व्यक्ती जगाच्या पाठीवर कोठेही समर्थपणे आणि आत्मविश्‍वासाने वावरु शकते. नवसमाज निर्मितीचा पाया शिक्षणसंस्थाच उभारतील, त्यामुळेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यानी राष्ट्रीर शैक्षणिक धोरण मांडले होते.

समाजाला आदर्श शिक्षकांची गरज आहे.  समाजात निर्माण होणार्‍या अराजकता, विध्वंसकता व अपप्रवृत्तींना पायबंद घालणारे जबाबदार नागरिक तयार करण्याची जबाबदारी शिक्षकांवरच आहे. शिक्षणामुळेच संवेदनशीलता वाढते. असे सांगत मस्के यानी साने गुरुजींच्या शामची आई पुस्तकातील बोधप्रसंग सांगितले. तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री व त्यांच्या पत्नी ललिता शास्त्री यांचा तत्वनिष्ठेचा प्रसंग सांगितला. तसेच मार्क टवेन म्हणतो, त्याप्रमाणे माणसाच्च्या जीवनातील कृतींचे प्रयोजन हे स्वार्थ आणि आनंद यामध्ये लपलेले असते. जीवनाचा अर्थ समजावून सांगण्याचे काम शिक्षण करते. तर जीवनातील स्वप्ने साकारण्यासही शिक्षण मदत करते. चिरकाळ टिकणारी संस्कृती शिक्षणामुळेच निर्माण होते. त्यामुळे नव्या सांस्कृतिक व्यावंस्थेसाठीही शिक्षणाची गरज आहे. 

जयाकुमार शितोळे रांनी आभारप्रदर्शन केले. 

admin: