आता सुंदर पिचाई एकाच वेळी असणार दोन कंपन्यांचे सीईओ

नवी दिल्ली | गूगलचे सीईओ भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांना नवीन जबाबदारी मिळाली आहे. पिचाई यांना बढती मिळाली आहे. आतागूगलची पॅरंड कंपनी‘अल्फाबेट’चेही CEO झाले आहेत. आतापर्यंत ही जबाबदारी ‘गुगल’चे सहसंस्थापक लॅरी पेज यांच्याकडे होती. मात्र, मंगळवारी लॅरी पेज यांनी पदउतार होत असल्याची घोषणा केली. सह-संस्थापक सर्गेई ब्रिन यांनी देखील ‘अल्फाबेट’चे अध्यक्ष म्हणून पद सोडण्याचं जाहीर केलं. त्यामूळे हे पद रद्द करण्यात आलं असून अल्फाबेटच्या सीईओपदाची जबाबदारी सुंदर पिचाई यांच्यावर टाकण्यात आली आहे. आता सुंदर पिचाई हे एकाचवेळी दोन कंपन्यांचे सीईओ म्हणून कार्यरत असणार आहेत.

जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या आणि त्याची पॅरंड कंपनीचा हेड आता एक भारतीय वंशाचा नागरिक असणार आहे. ही एक खूप मोठी संधी आहे. गूगलची सुरुवात 1997 मध्ये झाली होती. यानंतरपासून इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगतात बदल झाले. गूगल जसजसे मोठे होत गेले. त्यांना इतर क्षेत्रांमध्ये प्रगती करण्यास सुरुवात केली.

2015 मध्ये गुगलने कंपनीच्या स्वरूपात मोठा बदल करताना अल्फाबेटची स्थापना केली होती. अल्फाबेट ही विविध कंपन्यांचा समूह असलेली कंपनी आहे. अल्फाबेट गुगलला वायमो (चालकरहित कार) व्हेरिली (जैव विज्ञान) कॅलिको (बायोटेक आर एंड डी) आणि लून ( फुग्याच्या सहाय्याने ग्रामीण क्षेत्रात इंटरनेटची उपलब्धता) यांसारख्या इतर संस्थांपासून वेगळं ठेवते.

हे सर्व गुगलचे मूळ व्यवसाय नाहीत.
नव्या बदलांनंतर सर्गेई ब्रिन आणि गुगलचे दुसरे सहसंस्थापक लॅरी पेज कंपनीमध्ये सहसंस्थापक, शेअरधारक आणि अल्फाबेटचे बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून कार्यरत राहणार आहे. दुसरीकडे पिचाई यांना गुगल आणि अल्फाबेट या दोन्ही कंपन्यांना सीईओची जबाबदारी देण्यात आली आहे. यासोबतच पिचाई अल्फाबेटचे बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून देखील कायम असतील.

ग्लोबल न्युज नेटवर्क: