106 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर येणार चिदंबरम, सुप्रीम कोर्टातून मिळाला जामीन

नवी दिल्ली | आयएनएक्स मनी लॉन्डिंग प्रकरणी माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेता पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर झाला आहे. याप्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयानं चिदंबरम यांना दोन लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. त्यामुळे चिदंबरम यांचा तिहार तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

चिदंबरम यांनी या प्रकरणी हायकोर्टाकडून आलेल्या हाय कोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले होते. यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय राखीव ठेवला होता. बुधवारी सुप्रीम कोर्टाने 2 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. चिदंबरम यांच्यासाठी हा मोठा दिसाला आहे. कारण गेल्या 106 दिवसांपासून ते ईडीच्या तावडीत होते. जामीन मिळाल्यानंतर चिदंबरम यांनी या प्रकरणी सार्वजनिक मुलाखत देऊ नये असेही कोर्टाने बजावले आहे.

आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाबरोबरच सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आला होता. त्यानंतर चिदंबरम यांना 21 ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने अटक केली होती. अटक झाल्यापासून पी चिदंबरम जामीन मिळवण्याच्या प्रयत्नात होते. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन दिला आहे. आता ईडीच्या गुन्ह्यातही त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: