साहेबांच्या हृदयाचे किती तुकडे होत असतील याचा अहिरांनी विचार केला का? – जितेंद्र आव्हाड


सत्ता जर सर्वस्व मानलं तर राजकारणात नाते विश्वास या गोष्टींना काहीच अर्थ राहिला नाही

मुंबई | राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिरांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. गुरुवारी सकाळी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हातात शिवबंधन बांधले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. सचिन अहिर हे राष्ट्रवादी पक्षातील बडे नेते होते. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीतील नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. मी पक्ष बदलला तरीही शरद पवार साहेब हे माझ्या हृदयात राहतील असे सचिन अहिर म्हणाले. यावर आता जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया आली आहे. साहेबांच्या हृदयाचे तुकडे होत असतील याचा सचिन अहिरांनी विचार केला का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

माझे अत्यंत जवळचे मित्र गेल्या अनेक वर्षांचे सहकारी आम्हाला सोडून दुस-या पक्षात गेले. या घटना वाईट आहे. निष्ठा किंवा स्वामी निष्ठा याचा काही संबंध राहिलाय की नाही? असा प्रश्न यावेळी जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला. सत्ता जर सर्वस्व मानलं तर राजकारणात नाते विश्वास या गोष्टींना काहीच अर्थ राहिला नाही. ज्या सचिन अहिर यांना शरद पवार साहेबांनी लहानपणासून आधार दिला. विविध पदं दिली, सचिन अहिर आले आणि साहेबांनी कधी दरवाजा उघडला नाही असं गेल्या 20 वर्षात असं कधीच घडलं नसेल. असं काय झालं की सचिन अहिर यांनी आमची साथ सोडावी? असा प्रश्नही आव्हांडांनी उपस्थित केला.

आमच्या हृदयात शरद पवार आहेत तर मग असं केल्याने त्यांच्या हृदयाचे काय तुकडे होत असतील याचा सचिन अहिर यांनी विचार केला का? यापुढे असं समजायचं का की राजकारणात आता यापुढे हृदय वगैरे काही नसते. ते हृदय घरी ठेवून यायचे आणि बाजारात फिरायचे. सचिन अहिर असं करतील हे मला कधीही वाटलं नव्हतं. राजकारणात प्रेम, माया, नातं, विश्वास सहवास याचा संबंध संपला आहे. असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेल्या सचिन अहिरांवर टीका केली.

काल जे गांधीची पुजा करायचे त्यांना नतमस्तक व्हायचे ते आता नथुरामला नतमस्तक होतील हे पाहून गांधीजींना ही लाज वाटेल की मी यांच्यासाठी का गोळ्या झेलल्या? हे सगळं धक्कादायक आणि यातना देणारे आहे. साहेबांनी कोणावर विश्वास ठेवायचा. आज वयाच्या 80 व्या वर्षी त्यांना हे पहावं लागतय, ते जर साठीचे असते तर त्यांनी पुन्हा एक झंजावात उभा करुन या सर्वांना आडवे पाडले असते. ते शरद पवार आहेत त्यांच्याकडे अद्भूतशक्ती आहे ते काय करतील हे सांगू शकत नाही. पण शरद पवारांना हृदय आहे यांच्यासाठी साहेबांनी काहीच कमी केले नाही. असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सचिन अहिरांवर टीकास्त्र सोडले.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी व Filmy Marathi चे फेसबुक पेज
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: