अर्थसंकल्प 2019; जाणून घ्या सविस्तर,शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकार 10 हजार शेतकरी उत्पादक संघ बनवणार

अर्थसंकल्प 2019; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकार 10 हजार शेतकरी उत्पादक संघ बनवणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातले काही महत्त्वाचे मुद्दे पाहुयात…

सोने, पेट्रोल-डिझेल आणखी महागणार

पेट्रोल आणि डिझेलच्या एक्साईज ड्युटीत (अतिरिक्त कर) प्रत्येकी 1-1 रुपयांची वाढ करण्यात आल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार आहेत. तसेच सोने-चांदीच्या सीमाशुल्कात 2 टक्के वाढ करण्यात आल्याने सोनेही महागणार आहे.

इन्कम टॅक्ससाठी पॅनकार्डची गरज नाही

इन्कम टॅक्स भरण्यासाठी आता पॅन कार्ड सक्तीचे नाही. म्हणजे पॅन कार्डशिवायच तुम्ही इनकम टॅक्स भरू शकता. इन्कम टॅक्सची नोटीस पाठवण्यासाठी आता केंद्रीय स्तरावर एक विभाग करण्यात येणार आहे.

इन्कम टॅक्समध्ये बदल नाही

इन्कम टॅक्सच्या रचनेत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे 5 लाख रुपये उत्पन्नावर कर असणार नाही. पण 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना जुन्या रचनेप्रमाणेच कर भरावा लागणार आहे.

कररचनेत बदल झाला नसला तरी 2 ते 5 लाख रुपये उत्पन्नावरचा सरचार्ज म्हणजे अधिभार मात्र वाढला आहे. 2 लाख ते 5 लाख उत्पन्न असणाऱ्यांसाठी 3 टक्के सरचार्ज लागेल. 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर 7 टक्के सरचार्ज भरावा लागेल.

घर घेणं झालं सोपं

मध्यमवर्गाला आता घर घेणं सोप्पं होणार आहे. कारण 45 लाख किंमतीचे घर घेतल्यास त्यावरील दीड लाख रुपये व्याज माफ करण्यात येणार आहे. तसेच आता गृहकर्जाच्या व्याजावर मिळणारी सूट 2 लाखाहून 3.5 लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे.

59 मिनिटात एक कोटीचं कर्ज

सध्या सुरू असलेल्या छोट्या उद्योगांना आणि नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या छोट्या उद्योगांसाठी अवघ्या 59 मिनिटात 1 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे.

लघू उद्योजकांच्या कर्जात वाढ करण्यासाठी कर्जाच्या रकमेत वाढ करण्याची शिफारस बँकांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे केली होती. त्यानुसार लघू उद्योगांसाठी ही रक्कम वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे सीडबी, भारतीय स्टेट बँकेसहीत 21 राष्ट्रीय बँकांमधून हे कर्ज वितरीत केलं जाणार आहे. सध्या सुरू असलेल्या उद्योगांसाठीही ही योजना लागू राहणार आहे

श्रीमंतांवरचा करदर वाढवला!

कोट्यधीशांवरचा कराचा बोजा मात्र वाढवण्यात आला आहे. 1 कोटीहून जास्त उत्पन्न असणाऱ्यांना करावर आता अधिभारही भरावा लागणार आहे. जितकं जास्त उत्पन्न तितका जास्त कर ही निती अवलंबवण्यात येणार आहे.

छोट्या दुकानदारांना पेन्शन

देशातील 3 कोटी छोट्या दुकानदारांना पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत 60 वर्ष पूर्ण करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना तसेच दुकानदारांना कमीत-कमी 3 हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. जीएसटीअंतर्गत ज्या व्यापाऱ्यांची आर्थिक उलाढाल दीड कोटींच्या खाली आहे. त्या व्यापाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

आता ‘स्टडी इन इंडिया’ योजना

: या योजनेअंतर्गत परदेशातील विद्यार्थ्यांना भारतात उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारतातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये जवळपास 50 हजार परदेशातील विद्यार्थी शिक्षण घेतात. ‘स्टडी इन इंडिया’मुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे

काय स्वस्त काय महाग?

हे’ महाग होणार

▪ गुटखा, सिगरेट, तंबाखू या तंबाखूजन्य पदार्थांवर अतिरिक्त आकारण्यात येणार
▪ पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये प्रती लिटर दोन रुपयांनी वाढ होणार आहे.
▪ सोन्यावरील आयात कर 10 टक्क्यांवरुन 12.50 टक्के करण्यात आल्याने सोने महागणार
▪ पदेशातून येणाऱ्या पुस्तकांवरील कर वाढवल्याने किंमत वाढणार
▪ पिव्हीसी पाईप, गाड्यांचे सुटे भाग, सिंथेटीक रबर, टाइल्स, फ्लोअरिंग (व्हिनएल फ्लोअरिंग)

‘हे’ स्वस्त होणार :

▪ विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या खरेदीवर विशेष सवलती, यामुळे इलेक्ट्रीक कार स्वस्त होणार
▪ विमा स्वस्त होणार
▪ घरे स्वस्त होणार : भाड्याने घरे घेण्यासंदर्भातील कायद्यामध्ये बदल करणार

ग्लोबल न्युज नेटवर्क: