अयोध्येतील राम मंदिरासाठी शिया वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांकडून ५१००० ची देणगी

अयोध्या: पिटीआय

अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिरासाठी ५१ हजार रुपयांची देणगी देण्याची घोषणा उत्तर प्रदेशमधील शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसिम रिझवी यांनी शुक्रवारी केली. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला होता.

अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारले गेले पाहिजे, असेच शिया वक्फ बोर्डाचेही मत होते, असे सांगून वसिम रिझवी म्हणाले, गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने उत्कृष्ट निकाल दिला आहे. यापेक्षा चांगला निकाल दिला जाऊच शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या शनिवारी सर्वोच्च न्यायालायने अयोध्येतील २.७७ एकरची वादग्रस्त जागा राम मंदिर उभारणीसाठी देण्याचा निकाल दिला. या ठिकाणच्या एकूण ६७ एकर जागेपैकी पाच एकर जागा मुस्लिम पक्षकारांना देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी एक विश्वस्त मंडळ तीन महिन्यांत तयार करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. 

ग्लोबल न्युज नेटवर्क: