अपक्ष आमदार राजेंद्र राऊत भाजप सोबत, मुख्यमंत्र्याची घेतली भेट

बार्शी : सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिलेल्या बार्शी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी विजय मिळवला आहे. निकाल जाहीर होताच दुसऱ्या दिवशी राऊत यांनी आपल्या सहकाऱ्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन भाजप सोबत असल्याचे सांगितले.

विजयानंतर राजेंद्र राऊत हे सहकारी विश्वास बारबोले,नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, भारत पवार, प्रशांत कथले, नवनाथ चांदणे या पदाधिकाऱ्या समवेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या भेटीत भाजप नेत्यांबरोबर प्रदीर्घ चर्चा केली. या भेटी बाबत राजेंद्र राऊत म्हणाले की, बार्शीच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेच्या आग्रहास्तव मला ही निवडणूक लढवावी लागली याची कल्पना सर्व मान्यवरांना दिली.चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, अन्य पदाधिकारी यांच्याशी गाठभेट घेऊन आगामी विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांच्याशी बिनशर्त सहकार्य करण्याबाबत विस्तृत चर्चा केली.

दरम्यान बार्शी विधानसभा मतदारसंघात परंपरेप्रमाणे दिलीप सोपल विरुध्द राजेंद्र राऊत सामना रंगला होता. सोपल यांनी अचानक राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. तर युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे राहणार असल्याचं अंदाज आल्याने राऊत यांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरुवातीपासून ठेवली . सोपल हे धन्युष्यबाणाच्या तर अपक्ष असणारे राऊत ट्रॅकर चिन्हावर लढले. अखेर या चुरशीच्या लढाईत राजेंद्र राऊत यांनी उल्लेखनीय विजय मिळवला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: