अजित पवार जळगावला रवाना, नाराज खडसेंना राष्ट्रवादीची गळ?

पुणे । विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होताच उमेदवारी न मिळालेल्यांनी बंडाच्या तलवारी उपसणे सुरू केले आहे. सर्वात जास्त अंसतोष भारतीय जनता पक्षात उफाळून आला असून, दुसऱ्याही यादीत नाव नसल्यास अपक्ष लढण्याचा पवित्रा पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी घेतल्याचे सांगण्यात येते.

अजित पवार आज राज्याच्या दौऱ्यावर आहेत. पुण्यातून ते थेट जालना, घनसांगवी याठिकाणी जाणार असून, तेथून ते जळगावला जाणार आहेत. याठिकाणी ते एकनाथ खडसे यांची भेट घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अजित पवार यांनी नुकतेच सुरवात त्यांनी केली, शेवट आम्ही करू असा इशारा सत्ताधारी भाजप-शिवसेनेला दिला होता. त्यामुळे खडसेंना पक्षात आणून राष्ट्रवादी भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत तर नाही ना हा प्रश्न आहे.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: