मै झुकेगा नही’:ज्याने हिटलरच्या फौजेच्या नाकी नऊ आणले त्या लेफ्टनंटचे नातू आहेत झेलेंस्की

‘मै झुकेगा नही’:ज्याने हिटलरच्या फौजेच्या नाकी नऊ आणले त्या लेफ्टनंटचे नातू आहेत झेलेंस्की म्हणूनच बलाढ्य रशियाला रस्त्यावर उतरून देत आहेत आव्हान

रशियाला झुंजवणारे वोल्डोयोमीर झेलेन्स्की कोण?

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की कधी लष्कराचा गणवेश घालून लढवय्यांचे मनोबल वाढवताना दिसतात, तर कधी टीव्ही स्क्रीनवर रशियाला आव्हान देताना दिसतात. सुपर पावर रशियन सैन्यासमोर गेल्या पाच दिवसांपासून मोर्चा सांभाळत असलेल्या जेलेंस्की यांचे आजोबा सिमॉन इवानोविच हे एकेकाळी रशियन रेड आर्मीचे लेफ्टनंट होते.

जेलेंस्की यांचे आजोबा सिमॉन यांनी दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नाझी सैन्याला हैराण करुन सोडले होते. आज त्यांचा नातू जेलेंस्की रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचा शत्रू आहे. चला तर पाहूया, हा जोश आणि धाडस कशा प्रकारे झेलेंस्की यांच्या नसानसात घुमत आहे.

झेलेंस्की यांना हे धैर्य आणि हिंमत आपले आजोबा सिमॉन यांच्याकडून मिळाले. याच रशियाने त्यांचे आजोबा सिमॉन यांच्या शौर्याचा गौरव करून त्यांना रणांगणाच्या मध्यभागी पदोन्नती दिली आणि थेट गार्डचे लेफ्टनंट बनवले. सिमॉन यांनी त्या काळातील सर्वात शक्तिशाली जर्मन सैन्याविरुद्ध 18 दिवस धैर्याने लढा दिला होता. यामुळेच युक्रेनच्या वॉर मेमोरियलमध्ये रेड आर्मीचा नायक म्हणून त्यांचे नाव सुवर्णाक्षरात नोंदवले गेले आहे.

या धाडसाचा पुरावा देत, सिमॉन यांचे नातू वोलोदिमीर झेलेंस्की यांनी अमेरिकेकडून सुरक्षेची ऑफर नकारली. त्यांना युक्रेनमधून दुसऱ्या देशात हलवण्याचा प्रस्ताव होता. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, मला दुसरीकडे हलवण्यापेक्षा आम्हाला शस्त्रास्त्र द्या. मी कुठेही पळून जाणार नाही. मी इथेच लढणार आहे.” असे झेलेंस्की म्हणाले.

असे रोल मॉडल बनले होत सिमॉन झेलेंस्की

1918 च्या सोवियत युनियनमध्ये, कामगार आणि शेतकऱ्यांनी स्वतःचे सैन्य तयार केले होते. हे सैन्य दुसऱ्या महायुद्धात सोवियत रेड आर्मीच्या खांद्याला खांदा लावून लढले.

सिमॉन जेलेंस्की याच आर्मीच्या मोर्टार प्लॅटूनचे कमांडर होते. त्यांनी रेड आर्मीची सर्वात महत्त्वपूर्ण यूनिक 57 गार्ड्स रायफल डीव्हीजनची 174 वी रिजेमेंटला लीड केले होते. ते 23 जानेवारीपासून 9 फेब्रुवारी, 1944 पर्यंत युद्धाच्या मैदानात होते.

त्यांच्या युनिटमध्ये जर्मनी सैन्याचे अनेक टँक आणि मिसाइल गनवर ताबा मिळवला होता.

वडील-भावांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी फौजी बनले होते

सिमॉन झेलेंस्की यांचे वडील आणि 3 भावांच्या कुटुंबाला हिटलरच्या सैन्याने केवळ ज्यू असल्याने जमिनीत जिवंत गाडले होते.

तेच ज्यू, ज्यांचा हिटलर द्वेष करत होता. त्यांनी चार वर्षे म्हणजे 1941 ते 1945 च्या दरम्यान जवळपास 6 लाखांपेक्षा जास्त यहूदींना एकतर काँसंट्रेशन कॅम्पमध्ये जिंवत जाळले होते किंवा जिवंतच जमिनीत गाडले होते.

हिटलरच्या क्रूरतेवर हॉलिवूडने अनेक ऐतिहासिक चित्रपट बनवले आहेत. ज्यामध्ये द पियानिस्ट, सिंडलर्स लिस्ट, स्ट्राइप्ड बजामा प्रमुख आहेत.

यूक्रेनच्या प्रेसिडेंटने पुतीन यांना करुन दिली होती या कथेची आठवण

24 फेब्रुवारीला पुतीन यांनी युद्धाची घोषणा करताना म्हटले होते – मी युक्रेनचा डिमिलिटराइजेशन (असैन्यीकरण) आणि डिनाजीफिकेशन (नाजियांच्या ताब्यातून मुक्त) करेल.

यावर झेलेंस्की यांनी आपल्या आजोबांची कहाणी ऐकवली होती. झेलेंस्की यांनी म्हटले होते, ‘युक्रेन नाजींच्या ताब्यात कसे असू शकते, मी तर नाजी नाही? माझे आजोबा तर नाजींच्या विरोधात उभे होते आणि त्यांनी तिथे धैर्याने शत्रूंचा सामना केला होता. ‘

खरेतर, पुतीन यांना रशिया आणि जगातील लोकांना भ्रमित करायचे होते, कारण जगातील इतिहासकारांच्या एका गटाला असे वाटते की, युक्रेनचे काही लोक हिटलरी सैन्यात सामिल झाले होते. मात्र ही संख्या खूप कमी होती.

जे शत्रू होते आता मित्र बनले, जर्मनी करत आहे युक्रेनची मदत

वेळ देखील कशी बदलेल हे सांगता येत नाही. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे आजोबा यांनी ज्या देशाची साथ दिली. तोच देश त्यांच्या नातुचा शत्रू बनला आहे आणि ज्या देशाच्या विरोधात त्यांनी युद्ध लढले होते, आज तोच देश युक्रेनची मदत करत आहे.

हो, आम्ही जर्मनीविषयी बोलत आहोत. जर्मनीने यूक्रेनला सर्वात पहिले हत्यार पोहोचवले होते. जर्मनीने स्वतः देखील हिटलच्या हतिसाहासाला आपल्याकडे काळा अध्याय म्हणून घोषित केले आहे.

विक्टर डेवर आपल्या आजोबांच्या कब्रीजवळ अवश्य जातात प्रेसिडेंट

प्रेसिडेंट झेलेंस्की प्रत्येक वर्षी विक्टर डे म्हणजे 9 मे रोजी आपल्या आजोबांच्या कब्रीजवळ जाऊन काही काळ घालवतात. 2020 मध्ये राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर तत्काळ त्यांनी आपल्या आजोबांच्या कब्रीजवळ जाऊन फूल अर्पण केले होते. त्यावेळी सिमॉन यांची कहानी इंटरनॅशनल मीडियाने खूप चालवली होती.

कोण हे झेलेन्स्की?

व्लादिमीर पुतीन यांनी जणू युक्रेनमधील (नाझीकरण संपवण्याचा) करण्याचा चंगच बांधला आहे. परंतु युक्रेनच्या आग्नेयेकडील एका शहरात वाढलेले झेलेन्स्की हे स्वत: यहुदी आहेत. वोल्डोयोमीर झेलेन्स्कींचा जन्म 25 जानेवारी 1978 रोजी युक्रेनियन एसएसआर येथील क्रिवी रिह येथे यहूदी कुटुंबात झाला. त्यांचे वडील, ऑलेक्झांडर झेलेन्स्की एक प्राध्यापक आहेत. तेक्रिव्येव रिह इन्स्टिट्यूटमध्ये सायबरनेटिक्स आणि कॉम्प्युटिंग हार्डवेअरच्या शैक्षणिक विभागाचे प्रमुख आहेत. तर झेलेन्स्की यांच्या आई रिम्मा झेलेन्स्की अभियंता म्हणून काम करत होत्या. वोल्डोयोमीर झेलेन्स्कीं सुरुवातीचे काही वर्षे एर्डनेट या मंगोलियन गावात राहिला. जिथे त्यांचे वडील काम करत होते. वोल्डोयोमीर झेलेन्स्कीं यांनी त्यांच्या मूळ शहरात क्रिवी रिह येथेच कीव नॅशनल इकॉनॉमिक युनिव्हर्सिटीमध्ये कायद्याचा अभ्यास केला. परंतु कायदेशीर क्षेत्रात व्यावसायिकरित्या काम केले नाही. मात्र अनेकदाइस्रायलमध्ये जाऊन झेलेन्स्की यांना उच्च शिक्षण घ्यायचे होते. पण त्यांच्या वडिलांनी युक्रेनमध्येच राहून त् शिकण्याचा सल्ला दिला. तो मानून झेलेन्स्की यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. मात्र अनपेक्षितपणे ते अभिनय क्षेत्राकडे वळाले.

२०१९ मध्ये युक्रेनचे अध्यक्ष होण्यापूर्वी ते एक विनोदी अभिनेते म्हणून ते प्रसिद्ध होते. या लोकप्रियतेमुळेच त्यांना युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून येण्यासाठी मोठा उपयोग झाला. त्यांनी साकारलेली एक भूमिका त्यांना राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत घेऊन गेली.

वोल्डोयोमीर झेलेन्स्कीं Kvertel 95 ही चित्रपटनिर्मिती कंपनी तयार केली. क्वार्टल कंपनीने यांनी सर्व्हंट ऑफ द पीपल ही टेलिव्हिजन मालिका तयार केली. या मालिकेत झेलेन्स्कीं यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाची भूमिका साकारली होती. 2015 ते 2019 पर्यंत ही मालिका प्रसारित झाली. त्याच नावाचा राजकीय पक्ष मार्च 2018 मध्ये कव्हर्टल 95 च्या कर्मचाऱ्यांनी स्थापन केला. या मालिकेत त्यांनी साकरलेले एक पात्र राजकारणातील भ्रष्टाचाराला कंटाळून स्वतःच एक दिवस राष्ट्राध्यक्ष बनते! झेलेन्स्की यांच्या बाबतीतही तेच घडले.

राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीची घोषणा

झेलेन्स्की यांनी 31 डिसेंबर 2018 रोजी संध्याकाळी 1+1 टीव्ही चॅनलवर त्यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीची घोषणा केली. झेलेन्स्की यांच्या अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर होण्याच्या केवळ सहा महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या जनमत चाचण्यांमध्ये ते आघाडीवर होते. झेलेन्स्की यांनी 2019 च्या युक्रेनियन अध्यक्षीय निवडणुकीत 73.22% मते मिळवून युक्रेनचे तत्कालीन अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांचा पराभव करून राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली.

युक्रेनमध्ये युक्रेनियन आणि रशियन भाषकांमध्ये आजही मोठी दरी आहेत. युक्रेनमध्ये रशियन भाषिक बहुसंख्येने आहेत तर यहूदी अल्पसंख्यांक आहेत. परंतु अध्यक्षपदावर विराजमान झाल्यापासून झेलेन्स्की यांनी रशियन-यहूदी दरी मिटवण्याचा प्रयत्न केला. युक्रेनला यहुदीविरोधाचा मोठा इतिहास आहे. परंतु इस्रायल व्यतिरिक्त यहुदी राष्ट्राध्यक्ष असलेला युक्रेन हा एकमेव देश आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे. अशातच आता व्लादिमीर पुतीन युक्रेनवर आक्रमन करत युक्रेनचे एकामागोमाग एक प्रांत ताब्यात घेत आहेत. तर इतिहास, भाषा, वंश, विचारधारा आणि आता युद्धामुळे दुभंगलेल्या युक्रेनियन नागरिकांना पुन्हा एकजुटीने उभे राहण्यासाठी ते प्रोत्साहन देताना दिसत आहेत.

युद्धाच्या कठीण काळातही त्यांची विनोदबुद्धी शाबूत आहे. युद्धाच्या दूसऱ्याच दिवशी रशियाने झेलेन्स्की युक्रेनमधून पळून गेल्याचे सांगितले. मात्र रशियाने आक्रमण केल्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी देशवासियांशी संवाद सधाला. या वेळी झेलेन्स्की देश सोडून पळून गेल्याच्या रशियन प्रचाराला सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्यानंतर अमेरिकेने त्यांना देश सोडण्यासाठी मदतीची ऑफर दिली, पण त्यावेळीही त्यांनी अमेरिकेची ऑफर नाकारत, मला दारूगोळा हवा, पळून जाण्यासाठी पालखी नको, असे उत्तर दिले. कोणत्याही परिस्थितीत युक्रेनचे सार्वभौमत्व, स्वातंत्र्य रशियाला सुपूर्द करणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत लढणार, हा त्यांचा निर्धार जगभरातील लोकांना भावला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: