Monday, March 27, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

युजरनं सुनील शेट्टीला म्हटलं ‘गुटखा किंग’, अण्णांने दिल जबरदस्त प्रतिउत्तर

by Team Global News Marathi
May 10, 2022
in मनोरंजन
0
युजरनं सुनील शेट्टीला म्हटलं ‘गुटखा किंग’, अण्णांने दिल जबरदस्त प्रतिउत्तर

 

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार, शाहरूख खान, अजय देवगण हे तिघही तंबाखूच्या जाहिरातींमुळं सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल झालेत. नेटकऱ्यांनी अक्षय कुमारला इतकं ट्रोल केलं होतं की, त्याला माफी मागावी लागली होती. शिवाय, जाहिरातीवरही पाणी सोडावं लागलं होतं. अद्याप हे प्रकरण शांत झालेलं नसताना एका युजरनं या मुद्यावरून अण्णांची अर्थात सुनील शेट्टीची नाराजी ओढवून घेतली.

तर त्याचं झालं असं की, एका युजरने रस्त्यावर लागलेल्या तंबाखूच्या जाहिरातीच्या होर्डिंगचा फोटो ट्विट करत, यातील तिन्ही स्टार्सला टॅग करत त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अर्थात हे करताना या युजरकडून एक चूक झाली. होय, आपल्या ट्विटमध्ये त्यानं अजय देवगण ऐवजी चुकून सुनील शेट्टीला टॅग केलं. अण्णा मग शांत कसा बसणार? त्यानं त्या ट्रोलरला सडेतोड प्रतिउत्तर दिले होते.

😂😂😂😂😂😂 He tagged #AkshayKumar & #Srk but instead of tagging #AjayDevgn, he tagged #SunielShetty, and @SunielVShetty responds….I’m dead 😂😂😂 pic.twitter.com/flmmLzGvJQ

— Nishit Shaw (@NishitShawHere) May 9, 2022

 

‘या हायवेवर पान मसाल्याच्या एवढ्या जाहिराती पाहिल्यात की आता गुटखा खाण्याची इच्छा झालीय,’ असं म्हणत एका युजरने हायवेवरील पान मसाल्याच्या होर्डींगचा फोटो शेअर केला होता. त्यावर मोनी कृष्णन नावाच्या व्यक्तीनं प्रतिक्रिया देताना संबंधित जाहिरातीमध्ये दिसणाऱ्याअभिनेत्यांवर निशाणा साधला. ‘शाहरुख खान, अक्षय कुमार, सुनील शेट्टी तुम्ही देशाचे गुटखा किंग आहात. तुम्ही देशाला चुकीच्या दिशेने घेऊन चाललाय यासाठी तुमच्या मुलांना तुमची लाज वाटत असेल. देशाला कॅन्सरचा देश बनवू नका वेड्यांनो,’ असं लिहित त्याने त्याने संताप व्यक्त केला

गुटखा वा पान मसाल्याच्या जाहिरातींशी काहीही संबंध नसताना आपल्याला टॅग केलेलं पाहून सुनील शेट्टीनं या युजरला चांगलंच फटकारलं. शिवाय त्याची चूक त्याच्याच शब्दांत लक्षात आणून दिली. ‘भाई तू आपना चश्मा अ‍ॅडजस्ट कर ले या बदल दे,’ असा जोरदार टोला सुनील शेट्टीने या ट्विटला रिप्लाय करताना लगावला. पुढे युजरने आपली चूक लक्षात घेऊन अण्णांची माफी सुद्धा मागितली होती.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
आता मुंबईकरांना तिकिटासाठी लाइन लावायची गरज नाही, बस आणि लोकल प्रवासासाठी एकच पास !

मुख्यमंत्र्यांच्या सभेचा दुसरा जबरदस्त टीझर जारी, शिवसेनेची जोरदार तयारी

Recent Posts

  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • एकनाथ शिंदेचा राऊतांना दणका;संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवले; कीर्तिकरांची नियुक्ती!
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी सुनिता गाडेकर तर सचिवपदी गणेश शिंदे

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group