Thursday, June 8, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘यशवंत जाधवांनी मनी लाँड्रिंग केलं, तर महापौरांनी एसआरए सदनिका हडपल्या’

by Team Global News Marathi
February 25, 2022
in महाराष्ट्र
0
‘यशवंत जाधवांनी मनी लाँड्रिंग केलं, तर महापौरांनी एसआरए सदनिका हडपल्या’

 

मुंबई | आयकर विभागानं आज सकाळी मुंबई महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी छापा टाकला. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर कोविड सेटंर उभारणीत घोटाळा केल्याचे गंभीर आरोप केले होते. या सर्व प्रकरणात आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन टीका केली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, “यशवंत जाधव बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून खूप मोठे रॅकेट चालवत होते. मी काल महाविकासआघाडीच्या डर्टी डझन नेत्यांची नावे जाहीर केली होती. त्यावेळी मी काही नावं विसरला होतो. यामध्ये आता यशवंत जाधव, यामिनी जाधव आणि किशोरी पेडणेकर यांचा समावेश झाला आहे आसा आरोप करून पुन्हा एकदा महापौर पेडणेकर यांचे नाव घेतले आहे/

शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी मुंबईतील किती जुन्या इमारती विकत घेतल्या आहेत, याची यादी समोर आली तर शिवसेनेचे नेते किती मोठे माफिया आहेत, हे सगळ्यांना कळेल, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत. यशवंत जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादानं मुंबईकरांना लुटलं, हे शहर बरबाद केलं. त्यांच्यावर कारवाई व्हायला थोडा उशीरच झाला.

पुढे बोलताना सोमय्या म्हणाले की, यशवंत जाधव यांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये एक बनावट कंपनी स्थापन केली होती. स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले यशवंत जाधव पालिकेच्या कंत्राटदारांकडून रोख पैसे घ्यायचे. पालिकेच्या प्रत्येक कंत्राटातील ४० टक्के पैसे यशवंत जाधव यांना मिळायचे. हेच पैसे बनावट कंपन्यांच्या माध्यमातून इतरत्र वळवले जायचे. यशवंत जाधव यांच्या या रोख व्यवहारांचा पुरावा आयकर विभागाच्या हाती लागल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
मला जीवे मारण्याचा कट उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या संगनमतीने – किरीट सोमय्या

ठाकरे सरकारमधील 'डर्टी डझन' नेत्यांच्या यादीत दोन नाव विसरले 'यशवंत जाधव आणि किशोरी पेडणेकर'

Recent Posts

  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group