‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणादा व पाठकबाई अर्थात अभिनेता हार्दिक जोशी व अक्षया देवधर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. काही महिन्यांपूर्वी अचानक साखरपुड्याचे फोटो शेअर करत या दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्याआधी दोघांनीही आपल्या नात्याची भणकही कुणाला लागू दिली नव्हती. अचानक त्यांच्या साखरपुड्याचे फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती या जोडप्याच्या लग्नाची. तर लगीनघाई सुरू झाली आहे.
हार्दिक व अक्षया दोघंही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पण कधी? याचा खुलासा होत नव्हता. लग्नाच्या तारखेबद्दल या जोडप्यानं कमालीची गुप्तता पाळली आहे. पण आता तोही खुलासा झाला आहे. काल हार्दिकने घरच्या केळवणाचा फोटो शेअर केला होता. हार्दिकने हा फोटो शेअर केला आणि पाठोपाठ चुकून का होईना त्याच्या लग्नाच्या तारखेचा खुलासा झाला.
हार्दिक जोशी काल एक फोटो पोस्ट केला होता. त्याला त्याने ‘घरचं केळवण’ असं कॅप्शन दिलं. या फोटोत हार्दिक पारंपरिक यात तो छान पारंपारिक पोशाखात दिसतोय. त्याच्यासमोर पंचपक्वानांनी भरलेलं ताट आहे. त्या ताटाभोवती फुलांची छान सजावट केली असून सुंदर रांगोळी रेखाटलेली दिसतेय. हार्दिकने हा फोटो शेअर केला आणि यानंतर हार्दिकच्या एका मैत्रिणीने हाच फोटो उचलून आपल्या स्टेटसवर पोस्ट केला.
शनिवारी 26 नोव्हेंबरला इन्स्टाग्राम स्टेटसवर ठेवलेल्या या फोटोत तिने हार्दिक जोशीला टॅग केलं होता. त्याबरोबरच ‘फक्त 6 दिवस शिल्लक’ असा हॅशटॅगही दिला होता. तिच्या या फोटोनंतर अनेक चाहत्यांनी लग्नाच्या तारखेचा अंदाज लावण्यास सुरुवात केली. यावरून हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर येत्या 1 किंवा 2 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे.