हाहाकार! एकामागोमाग 3 भाजप आमदारांचा कोरोनाने मृत्यू; मुलाने योगी व मोदी सरकारला झोडपले

हाहाकार! एकामागोमाग 3 भाजप आमदारांचा कोरोनाने मृत्यू; मुलाने योगी व मोदी सरकारला झोडपले

उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा हाहाकार सुरू असून दुसऱ्या लाटेचा सत्ताधारी भारतीय जनता पक्षालाही फटका बसत आहे. बुधवारी बरेलीच्या नवाबगंज मतदारसंघाचे भाजप आमदार केसर सिंह गंगवार (BJP MLA Kesar Singh Gangwar) यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर नोएडातील रुग्णालयात उपचार सुरू होता. उत्तर प्रदेशात आतापर्यंत तीन आमदारांचा एकामागोमाग एक कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या दरम्यान राज्य सरकार आपल्याच आमदारांवर उपचार करू शकत नसल्याचा आरोप आमदार केसर सिंह गंगवार यांचा मुलगा विशाल सिंह गंगवार याने केला आहे.

आमदार केसर सिंह गंगवार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. काही दिवस बरेलीमध्ये उपचार घेतल्यानंतरही त्यांची तब्येत सुधारली नाही. यानंतर त्यांचा मुलगा विशाल गंगवार याने सोशल मीडियावर पोस्ट करत परिस्थिती कथन केली होती. त्यानंतर आमदार केसर सिंह गंगवार यांना नोएडातील एका रुग्णालयात हलवण्यात आले होते. मृत्यूच्या एक दिवस आधी त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा दिसत होती. मात्र बुधवारी त्यांची तब्येत अचानक बिघडली. डॉक्टरांच्या पथकाने त्यांना वाचवण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला, मात्र ते त्यांना वाचवू शकलो नाही. दुपारी तीनच्या दरम्यान त्यांना मृत्यू झाला.

भाजप नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
दरम्यान, आमदार केसर सिंह गंगवार यांच्या निधनावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देवस सिंह यांनी दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

आतापर्यंत तीन आमदारांचा मृत्यू
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत तीन आमदारांचा मृत्यू झाला आहे. याआधी औरैया जिल्ह्यातील सदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश चंद्र दिवाकर (BJP MLA Ramesh Chandra Diwakar) आणि लखनौमधील पश्चिम क्षेत्र विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश चंद्र श्रीवास्तव (BJP MLA Suresh Chandra Srivastava) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

सामना ऑनलाइन

ग्लोबल न्युज नेटवर्क: