चिंताजनक ! पुणे शहरात आज नवीन 6 हजार 320 कोरोना रुग्णांची नोंद, 5 जणांचा मृत्यू
ग्लोबल न्यूज – पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत आज सुद्धा कमालीची वाढ पाहायला मिळाली. शहराच्या विविध भागातील नवीन 6 हजार 320 कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 3 हजार 381 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
कोरोनामुळे शहरातील पाच रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 9 हजार 152 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 5 लाख 69 हजार 828 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 38 हजार 007 सक्रिय रुग्ण शहरात आहेत, यामध्ये आज दिवसभरात नवीन 6 हजार 320 कोरोना बाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली.
तर, शहरात आज दिवसभरात 14 हजार 998 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. आजपर्यंत 41 लाख 37 हजार 242 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
पुणे कोरोना अपडेट : मंगळवार, दि. १८ जानेवारी २०२२
◆ उपचार सुरु : ३८,००७
◆ नवे रुग्ण : ६,३२० (५,६९,८२८)
◆ डिस्चार्ज : ३,३८१ (५,२२,६६९)
◆ चाचण्या : १४,९९८ (४१,३७,२४२)
◆ मृत्यू : ५ (९,१५२)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/yVEd7UqNFd— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 18, 2022
शहरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख सध्या चढताच पाहायला मिळत आहे, त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.