Tuesday, June 6, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एक वर्ष शेतात राब राब राबलो..अन् कराड इंजिनिअरिंगला गेलो

by ग्लोबल न्युज नेटवर्क
September 23, 2022
in महाराष्ट्र
0
एक वर्ष शेतात राब राब राबलो..अन् कराड इंजिनिअरिंगला गेलो

एक वर्ष शेतात राब राब राबलो..अन् कराड इंजिनिअरिंगला गेलो

डॉ.तानाजीराव सावंतांनी मन मोकळे करताना मांडला संघर्षमय जीवनाचा पट

मुंबई ” गरीबीमुळे तब्बल एक वर्ष शेतात पडेल ते काम केले.राब राब राबलो.त्यानंतरच्या काळात कराडला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला! संघर्ष माझ्या रक्तात आहे.त्यामुळेच सात आठ सहकाऱ्यांना घेऊन निष्ठेने सुरू केलेला शिक्षण क्षेत्रातला प्रवास आज इथपर्यंत येऊन पोहोचला. गुणवत्ता आणि गरीब विद्यार्थ्यांचे प्रश्न मला लगेच समजतात ते कोणी समजावून सांगण्याची गरजच नाही!”, अशा भावना जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे (जे.एस.पी.एम.) प्रमुख आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांनी व्यक्त केल्या.

 

आपल्या आक्रमक राजकीय शैलीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहणारे डॉ.तानाजीराव सावंत यांचे संवेदनशील आणि सामाजिक जाणीवेचे वेगळेच रुप मंत्रालयात त्यांच्या दालनात राज्यातील संपादकांच्या रंगलेल्या गप्पांमध्ये अनुभवायला मिळाले.

शिक्षण क्षेत्रात ” विद्यार्थी पालक” सारख्या अनेक प्रयोगांचे दाखले देताना गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी व त्यांच्या निष्ठावान टीमने केलेल्या परिश्रमाची माहिती त्यांनी दिली.राजकीय वाटचालीतील अनेक रंजक घडामोडींचे किस्से सांगतानाच स्वर्गीय डॉ.पतंगराव कदम यांनी भारतीय विद्यापीठातील प्राध्यापकपदाची नोकरी चक्क रेल्वे स्टेशनवर कशी दिली,यांची आठवणही सांगायला ते विसरले नाहीत.

या गप्पा सुरु असतानाच महाराष्ट्राला कोरोना संकटातून बाहेर काढण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावणारे तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे हे दालनात दाखल झाले.हीच संधी घेऊन संपादक व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी त्यांचे “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..” हे पुस्तक राजेश टोपे यांच्या हस्ते आरोग्यमंत्री डॉ.साव़ंत यांना भेट दिले.

या वेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य तथा साम टीव्हीचे संपादक पत्रकार राजेंद्र हुंजे, महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनचे संपादक अभिजीत कांबळे हेही उपस्थित होते.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आरोग्य मंत्रीइंजिनिअरिंगतानाजीराव सावंतराजां माने
ADVERTISEMENT
Next Post
चोरीची नवी ट्रिक | तेल लावून नग्न फिरून करायचा चोरी अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चोरीची नवी ट्रिक | तेल लावून नग्न फिरून करायचा चोरी अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Recent Posts

  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group