देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे बडे नेते पोहचले गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला

नवी दिल्ली : राज्यात सचिन वाझे, वीजबिल, शेतकरी कर्जमाफी तसेच विविध मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच आता विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातील बडे नेते गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला नवी दिल्ली येथे पोहचले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विविध चर्चेला उधाण आले आहे.

या भेटी संदर्भात माहिती देताना फडणवीसांनी ट्विट करून या भेटी संदर्भात माहिती दिलेली आहे. ” साखर उद्योगाच्या विविध समस्यांसंदर्भात आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांची एका शिष्टमंडळासोबत भेट घेतली”, अशी माहिती ट्विट करुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

तसेच शाह यांच्या भेटीला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पंकजाताई मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, शिवेंद्रराजे भोसले, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक, पृथ्वीराजबाबा देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, राहुल कुल आदी नेत्यांचा समावेश होता.

राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडी देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री अमित शहा यांची भेट घेणं यापाठीमागे आता राजकीय अर्थ लावले जात आहेत. तसेच या शिष्टमंडळाची भेट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात देखील काही मिनिटे गुफ्तगू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली या बद्दल विविध चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.

Team Global News Marathi: