भाजपचे लोक रस्त्यावर का उतरत नाही ! त्यांच्या घरी मुली, आई, बहिणी नाहीत का? – खासदार इम्तियाज जलील

भाजपचे लोक रस्त्यावर का उतरत नाही ! त्यांच्या घरी मुली, आई, बहिणी नाहीत का? – खासदार इम्तियाज जलील

हाथरस येथे एका अल्पवयीन दलित मुलीवर केलेल्या बलात्कारप्रकरणी संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरलेली आहे. त्यात उत्तरप्रदेश पोलिसांनी रातोरात सदर पीडित मुलीचा मृतदेह जळल्यामुळे उत्तरप्रदेश पोलिसांच्या वर्तणुकीवर संशय व्यक्त होत होता. यावर आता औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाष्य केले आहे.

यावर भाष्य करताना खासदार जलील म्हणाले की, सुप्रीम कोर्ट, सीबीआय, लोकसभा आणि पार्लमेंटवर आमचा विश्वास आहे. परंतु याच संस्था धोका देत असतील तर काळजी करण्याची वेळ आली आहे. पीडितेच्या घरच्यांना भेटू नाही दिले म्हणजे हा गुंडाराज आहे.

हाथरस घटनेतील बलात्काऱ्यांना औरंगाबादमधील क्रांती चौकात फासावर लटकावले पाहिजे. देशात जे सुरू आहे ही येणाऱ्या काळाची झलक आहे. भाजपाचे लोक रस्त्यावर का उतरत नाहीत. त्यांच्या घरी मुली, आई, बहिणी नाहीत का?, असा सवाल जलील यांनी उपस्थित केला आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींना निंदनीय वागणूक दिली – शरद पवार

काल औरंगाबाद शहरायच्या वतीने घडलेल्या पीडित मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र जमले होते. यावेळी कॅण्डल मार्च काढून सदर मुलीला औरंगाबाद शहरवासीयांनी श्रधान्जली वाहिली यावेळी सदर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली.

जरा थांबा, विचार करा आणि आजपासून जगायला शिका..!

ग्लोबल न्युज नेटवर्क: