छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अभिवादन करत पुष्पवृष्टी करण्यात आली. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसेवर निशाणा साधला.
जो पक्ष दाऊद च्या माणसांना विमानातून फिरवतो, ज्यांचा मंत्री दाऊद ला पैसे पुरवतो, ज्यांचा आदर्शच दाऊद आहे त्या मटण करीं ना छत्रपतीं बद्दल बोलण्याचा अधिकारच नाही.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 21, 2022
अमोल मिटकरी यांनी मनसेवर टीका केल्यानंतर मनसेचे अमेय खोपकर यांनी मिटकरींवर सडकून टीका केली. दिवाळी, गणपती या हिंदु सणांप्रमाणे शिवजयंतीही आमच्यासाठी सण असल्याचंही खोपकर म्हणाले. त्यानंतर आता मनसेचे संदीप देशपांडे यांनी मटन करी असा उल्लेख करत मिटकरींना टोला लगावला आहे.
जो पक्ष दाऊदच्या माणसांना विमानातून फिरवतो. ज्यांचा मंत्री दाऊदला पैसे पुरवतो, ज्यांचा आदर्श दाऊद आहे त्या मटण करींना छत्रपतींबद्दल बोलण्याचा अधिकारच नाही, असं ट्विट करत संदीप देशपांडे यांनी अमोल मिटकरींवर निशाणा साधला आहे. यावर आता मिटकरी काय प्रतिउत्तर देतायत हे पाहावे लागणार आहे.