राज्यात सचिन वाझे प्रकरण चांगलेच गाजताना दिसत आहे. त्यात वाझे याला NIA कडून अटक करण्यात आल्यानंतर विरोधकांनी आघाडी सरकारला घेरले होते. तसेच NIA च्या चौकशीत अनेक गोष्टींचा खुलासे होत आघाडी सरकार बॅकफूटवर गेले होते. त्यात परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली होती. याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा फडणीवसांनी आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे.
केवळ पोलिस आयुक्तांची बदली करून चालणार नाही.
सचिन वाझे यांना ऑपरेट करणारे किंवा त्यांचे राजकीय हँडलर कोण, याचा शोध घेतला पाहिजे !
2018 मध्ये सचिन वाझे यांना सेवेत घेण्यासाठी माझ्याकडे लोकं पाठविण्यात आली होती…#Maharashtra pic.twitter.com/kwzDZJUIXE— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 17, 2021
ATS आणि NIA कडे टेप आहेत. त्यामध्ये वाझेने त्यांना काय काय म्हटलं आहे ते स्पष्ट आहे. या टेपमध्ये हिरेन आणि वाझे यांचे संभाषण आहे. त्याचा तपास केल्यास सर्व प्रकरणाचा उलगडा होईल, असा दावा फडणवीसांनी केला होता.
तसेच एकटे सचिन वाझे इतकं मोठं कुंभाड रचू शकत नाहीत. त्यांच्यामागे कोण कोण आहेत हे बाहेर आलं पाहिजे. हे पोलीसांचे अपयश नाही तर सरकारचे अपयश आहे. वाझे आणि परमबीर सिंग यांना कोण ऑपरेट करत होते. त्यांचे बॉस कोण आहेत, हे शोधून काढलं पाहिजे. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे, अशी मागणीही फडणवीसांनी केली होती.