Tuesday, June 6, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी वाढली, कोयना धरणात 68.9 टक्के उपयुक्त पाणीसाठा

by ग्लोबल न्युज नेटवर्क
August 11, 2020
in कृषी, जनरल
0
सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी वाढली, कोयना धरणात 68.9 टक्के उपयुक्त पाणीसाठा

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी वाढली,
कोयना धरणात 68.9 टक्के उपयुक्त पाणीसाठा

सातारा दि. 10 : कोयना धरणात आज 69.17
टी. एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 69.08 इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 24 नवजा येथे 50 व महाबळेश्वर येथे 50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे अवघा २४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर यावर्षी जूनपासून आतापर्यंत कोयनेला २७२३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर नवजा येथे सकाळपर्यंत ५० आणि यावर्षी आतापर्यंत २९७८ तसेच महाबळेश्वरला ५० व जूनपासून २९१३ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा या ठिकाणी खूपच पाऊस कमी आहे. आता पावसाळ्याचे थोडे दिवस शिल्लक राहिले आहेत. या दिवसांत येथील पाऊस वार्षिक सरासरी गाठतो की नाही ते लवकरच समजणार आहे.

दरम्यान, सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात १६३१० क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ७४.२९ टीएमसी इतका झाला होता. तसेच २४ तासांत धरणसाठ्यात जवळपास सव्वा टीएमसीने वाढ झाली. मागील काही दिवसांचा विचार करता कोयना धरण पाणीसाठ्यात कमी कमी वाढ होताना दिसून येत आहे

सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम – 6.96 (59.56), धोम -बलकवडी- 3.31 (83.49), कण्हेर – 6.83 (71.16), उरमोडी – 8.05 (83.40), तारळी- 3.96 (67.78), निरा-देवघर 6.27 (53.44), भाटघर- 15.54(66.12), वीर – 8.20 (87.12).

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: कोयनासातारा
ADVERTISEMENT
Next Post
श्री विठ्ठल मंदिर आले रूग्णांच्या मदतीला धावून , दोन ऑक्सिजन मशीनचे रूग्णालयास हस्तांतरण

श्री विठ्ठल मंदिर आले रूग्णांच्या मदतीला धावून , दोन ऑक्सिजन मशीनचे रूग्णालयास हस्तांतरण

Recent Posts

  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group