१ मे नंतर लसीकरण ठप्प झाल्यास आरोग्यमंत्री राजीनामा देणार का? – पी चिदंबरम

नवी दिल्ली : येत्या १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकाचे लसीकरण सुरु होणार आहे. मात्र सध्या संपूर्ण देशभरात लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागला आहे. त्यात अनेक राज्यांनी १ मे पासून सुरु होणाऱ्या १८ वर्षांवरील लसीकरण प्रक्रिया सुरु करण्यास असमर्थता दर्शवली आहे. या मुद्द्यावरून आता काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

देशातील सर्व जनतेला मोदी सरकार मुर्ख समजत आहे. त्यामुळे सरकारविरोधात आता जनतेने उठाव करण्याची गरज आहे, अशी आक्रमक भूमिका पी. चिदंबरम यांनी बुधवारी मांडली. देशात करोनावरील लसींचा आणि ऑक्‍सिजनचा तुटवडा नसल्याचा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यावरून चिदंबरम यांनी ट्‌विटरवरून वर्धन यांच्याबरोबरच मोदी सरकारवर शाब्दिक हल्लाबोल केला.

आरोग्य मंत्र्यांच्या दाव्याने मी चकित झालो. वृत्तपत्रांमधील बातम्या आणि वृत्तवाहिन्यांचे प्रसारण चुकीचे आहे का? सर्व डॉक्‍टर खोटे बोलत आहेत का? रुग्णांचे कुटुंबीयही खोटी वक्‍तव्ये करत आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. ते पुढे म्हणाले,’राज्य १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी अद्याप तयार नसल्याचा दावा केला. इतकंच नाही तर कोवीण अँप्स सहकार्य करत नाही. जर लस नाही म्हणून १ मे नंतर लसीकरण केंद्रांवरुन लोकांना घरी पाठवण्यात आलं तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का? असा सवाल पी चिदंबरम यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना विचारला आहे.

Team Global News Marathi: