व्ही-मार्क इंडिया लिमिटेडच्या इक्विटी शेअर्सची खुली भागविक्री गुरुवारी, 25 मार्च 2021 रोजी सुरू होईल

हरिद्वार येथील वायर्स आणि केबल उत्पादक व्ही-मार्क इंडिया लिमिटेड (कंपनी किंवा व्ही-मार्क) गुरुवार, 25 मार्च 2021 रोजी त्यांच्या कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या (आरंभिक “ऑफर” / “आयपीओ”) इनिशिअल पब्लिक ऑफरशी संबंधित बोली / ऑफर कालावधी सुरू करेल आणि बुधवार, ३१ मार्च 2021 रोजी बंद करेल. या ऑफरसाठीचा प्राइस बँड प्रति इक्विटी शेअर Rs.37-Rs.39 असा ठरविण्यात आला आहे. हे प्रस्तावित इक्विटी शेअर्स नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या इमर्ज प्लॅटफॉर्मवर सूचिबद्ध करण्यात येणार आहेत.

हा आयपीओ Rs.10 दर्शनी मूल्य असलेल्या एकूण 60,00,000 शेअर्सचा हा फ्रेश इश्युअन्स आहे. त्याची कॅप किंमत Rs.39 आहे आणि त्यांचे एकूण मूल्य Rs.2340 कोटीपर्यंत आहे. या इश्युमध्ये “मार्केट मेकर रिझर्व्हेशन पोर्शन”अंतर्गत सबस्क्रिप्शनसाठी दर्शनी मूल्य प्रत्येकी Rs.10 असलेल्या 3,00,000 इक्विटी शेअर्सपर्यंत आरक्षण समाविष्ट आहे; या कंपनीने आयपीओपूर्व राउंड आधीच पूर्ण केला आहे आणि एचएनआय गुंतवणूकदार श्री.मधुकर शेठ यांच्याकडून Rs. 327.60 लाखांच्या मोबदल्यात 8,40,000 इक्विटी शेअर्सची आयपीओपूर्व प्लेसमेंट प्राप्त झाली आहे.

या माध्यमातून संकलित होणाऱ्या निधीचा वापर प्रस्तावित नव्या कारखान्यासाठीचा Rs.15 कोटीपर्यंतचा भांडवली खर्च, Rs. 5 कोटींपर्यंतचे खेळते भांडवल आणि शिल्लक रक्कम इतर कॉर्पोरेट उद्दिष्टे भागविण्यासाठी करण्यात येणार आहे.
श्युची रचना पुढील प्रमाणे असेल. नेट इश्युच्या 50% शेअर्स म्हणजेच 28,50,000 इक्विटी शेअर्स रिटेल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, निव्वळ इश्युच्या 50% शेअर्स म्हणजेच 28,50,००० इक्विटी शेअर्स नॉन-इन्स्टिट्युशनल (अ-संस्थात्मक) गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

त्याचप्रमाणे क्यूआयबी नॉन-इन्स्टिट्युशनल हिश्शासाठी अर्ज करू शकतात. मार्केट मेकर्स रिझर्व्हेशन पोर्शन 3,00,000 इक्विटी शेअर्सचा असणार आहे जे एकूण इश्युच्या आकाराच्या 5% आहेत. ही कंपनी गेली 15 वर्षे कार्यरत आहे. ते बीआयएस आणि सीई मान्यताप्राप्त वायर्स आणि केबल्सची निर्मिती व्ही-मार्क या ब्रँड नावाच्या अंतर्गत करतात. हे उत्पादन उत्तराखंड येथील हरिद्वारमधील दोन कारखान्यांमध्ये होते. ही कंपनी वैविध्यपूर्ण विक्री व वितरण मिक्सच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांची विक्री करते.

Team Global News Marathi: