विमानात चढताना तीनवेळा अडखळले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन, पाहा व्हायरल व्हिडिओ

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  जो बायडेन  शुक्रवारी एअरफोर्स वन  या विमानात  चढताना पायऱ्या  चढताना तीनवेळा घसरले. यादरम्यान त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल  होत आहे ज्यात दिसत आहे की एअरफोर्स वनमध्ये चढताना बायडेन पायऱ्यांवरून घसरले. व्हाईट हाऊसने  याबाबत म्हटले आहे की राष्ट्राध्यक्ष 100 टक्के तंदुरुस्त आहेत.

विमानात स्वार होताना तीनवेळा अडखळले अमेरिकेचे राष्ट्रपती बायडन, पाहा व्हायरल व्हिडिओ

बायडेन यांचा व्हिडिओ व्हायरल

बायडेन या विमानातून अटलांटासाठी रवाना होत होते जिथे या आठवड्याच्या सुरुवातीला सामूहिक गोळीबार झाला आणि याचबाबत आशिया-अमेरिकन समुदायाच्या नेत्यांशी भेटीचा त्यांचा कार्यक्रम होता. व्हिडिओत दिसत आहे की राष्ट्राध्यक्ष बायडेन पायऱ्या चढताना बाजूच्या रेलिंगचा आधार घेत आहेत कारण इथे जोरदार वाराही आहे. हळूहळू ते पूर्ण पायऱ्या चढतात आणि मागे वळून सॅल्यूट करतात. 78 वर्षीय बायडेन नुकतेच अमेरिकेचे सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष झाले आहेत.

गेल्यावर्षी झाले होते हेअरलाईन फ्रॅक्चर

व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी हे स्पष्ट केलेले नाही की या घटनेनंतर बायडेन यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे की नाही. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात जेव्हा बायडेन आपल्या पाळीव कुत्र्याशी खेळत होते तेव्हा त्यांच्या पायाला हेअरलाईन क्रॅक केला होता. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत तत्कालीन विद्यमान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केल्यानंतर बायडेन यांनी जगातील सर्वात ताकदवान देशाची कमान आपल्या हाती घेतली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: