अमेरिका निवडणूक: ट्रम्प यांची सत्ता गेली, आता बायकोही जाणार.


घर फिरलं की घराचे वासे कसे फिरतात. अशी जुन्या काळाची एक म्हण आहे. ती खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आल्याचे अमेरिकेत पार पडलेल्या निवडणूकी नंतर पहावयास मिळत आहे. त्याला कारण ही तसेच आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा पराभव पदरी पडल्यानंतर, ट्रम्प यांच्या कुटुंबातही भूकंप होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेत निवडणुकांचा धुरळा उडालेला असताना आणि ज्यो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा पराभव केलेला असताना, ट्रम्प यांच्या कुटुंबातही मोठा भूकंप होण्याची चिन्ह आहेत. कारण डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे. महत्त्वाचं म्हणजे, संपत्तीच्या वादातून हा घटस्फोट होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील माध्यमांमध्ये याबाबत चर्चांना उधाण आलंय.गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प आणि मेलेनिया या व्हाइट हाऊस मध्ये स्वतंत्र रुमध्ये राहत होते.

 

सत्ता गेली, बायकोही जाणार?

मेलानियासह ट्रम्प यांनी आधीच्या दोन पत्नींसोबत लग्नाचे करार केले होते. करारानुसार ट्रम्प यांच्या पत्नी संपत्तीत कोणताही वाटा मागू शकत नाही. या पार्श्वभूमीवर मेलानिया यांनी मुलगा बॅरनसह संपत्तीततही हक्क मागितलाय. मात्र, ट्रम्प यांनी नकार दिल्याने गेल्या काही वर्षांत हा वाद सुरू झालाय. हा वाद इतका विकोपाला गेलाय की, ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडताच मेलानिया त्यांना घटस्फोट देण्याची शक्यता आहे.

 

1998 साली सुरू झालेली ट्रम्प-मेलानिया यांची लव्ह स्टोरी 2005 साली विवाहाच्या गाठींनी बांधली केली. मात्र, ती आता संपुष्टात येण्याच्या वळणावर येऊन पोहोचलीय. त्यामुळे, घर फिरलं की घराचे वासेही फिरतात अशी अवस्था डोनाल्ड ट्रम्प यांची होऊ शकते.
 

ग्लोबल न्युज नेटवर्क: